जनसेवा प्रतिष्ठानने केला परिचारीकांचा सन्मान

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ : आज परिचारिका (सिस्टर) दिनानिमित्त इगतपुरी ग्रामीण रुग्णालय आणि डेडीकेटेड कोवीड सेंटर येथे आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना सेवा देणाऱ्या परिचारीका वराडे सिस्टर, शेळके सिस्टर, इंगळे सिस्टर, बागुल सिस्टर, सपना सिस्टर तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वरुपा देवरे, डॉ. पूनम पाटिल, डॉ. शिल्पा थोरात आदींचा जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, शांतीलाल चांडक, अजित पारख, डॉ. प्रदिप बागल, विजय गुप्ता, प्रकाश नावंदर, नगरसेवक उमेश कस्तुरे, रहिम भाई शेख,संदिप गायकवाड, संतोष गायकवाड,फार्मासिस्ट आदमाने, अनंत पासलकर, ब्रदर चकोर, आंबोळे, बागुल आदी उपस्थित होते.