वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

इगतपुरीनामा न्यूज दि. २६ : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिरमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर स्कूल कमिटीचे अध्यक्ष कोशिरे तसेच स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, माता पालक व पालक शिक्षक समितीचे उपाध्यक्ष, सदस्य, न्यू मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक साळवे, शाळेच्या […]

संविधान ग्रुपच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. ०६ : भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इगतपुरी येथील संजीवनी आश्रमशाळा येथे दोनशे निवासी विद्यार्थ्यांना संविधान ग्रुप इगतपुरी शहरच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संविधान ग्रुपचे आयु. करुणाताई बर्वे, आयु. तेजस जगताप, राहुल देहाडे, गौतम गवारे, विशाल शिंदे, सचिन सोनकांबळे, सुनील जाधव, आकाश जाधव, संदीप रूपवते, सुनील […]

मोगरे येथे लेखक डॉ. शरद बाविस्कर यांचे हस्ते एसएनएफच्या 15 व्या वाचनालयाचे लोकार्पण

गाव तेथे वाचनालय -अमेरीकेतील रीयल डायनॅमीक्सच्या सामाजिक सहभागातून वाचनालय चळवळ इगतपुरीनामा न्यूज दि. ०२ : तालुक्यातील दुर्गम गाव मोगरे येथे एसएनएफ वाचनालयाचे उदघाटन लेखक आणि विचारवंत डॉ. शरद बाविस्कर यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला. धुळे जिल्ह्यातील सुपुत्र असलेले शरद बाविस्कर सध्या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. सध्या त्यांचे भुरा हे […]

महावितरण सामुदायिक संपावर! अधिकारी आणि कर्मचारी यांचा दोन दिवसांचा लाक्षणिक संप

समाधान कडवे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ इगतपुरी तालुक्यातील वैतरणा वीज निर्मिती केंद्रातील तसेच तालुक्यातील महावितरणचे वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २८ आणि २९ असे दोन दिवस लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपामध्ये महावितरण चे विविध पदांवरील उच्चपदस्थ अधिकारी, अभियंता अशा २७ संघटना तसेच १२ कंत्राटी संघटना सहभागी झाले […]

महत्त्वाची बातमी : बारावीच्या लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशतः बदल

इगतपुरीनामा न्यूज दि. २४ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या (एचएससी) परीक्षेत अंशतः बदल करण्यात आला आहे. मार्च – एप्रिल २०२२ मध्ये होवू घातलेल्या बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकातील दोन तारखांमध्ये तांत्रिक कारणामुळे बदल करण्यात आला असून शनिवार ५ मार्च रोजी घेण्यात येणारा सकाळ आणि दुपार सत्राचा पेपर आता नव्या […]

ब्रेकिंग न्यूज : सोमवारपासून शाळा सुरू करण्यास राज्य सरकारची सशर्त परवानगी

इगतपुरीनामा न्यूज दि. २० : जेमतेम काही दिवस सुरू असलेल्या राज्यातील शाळा कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागल्याने राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी पुन्हा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आज झालेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत येत्या सोमवार पासून राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली असून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून […]

संजीवनी आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांनी घेतली कोविड प्रतिबंधक लस

इगतपुरीनामा न्यूज दि. ०६ : कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात सुरुवात झाली आहे. इगतपुरी येथील संजीवनी माध्यमिक आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थी आणि तळेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसह एकूण ६५ विद्यार्थ्यांना यावेळी कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र, […]

चिंचलेखैरे शाळेने केले अनोख्या पद्धतीने अभिवादन : त्रिंगलवाडी किल्ला सर करून साजरी केली सावित्रीबाई फुलेंची जयंती

इगतपुरीनामा न्यूज दि. ३ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचलेखैरे यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सर्व सावित्रीच्या लेकी घेऊन त्रिंगलवाडी किल्ल्यावर जाऊन सावित्रीबाईंच्या ओव्या गाऊन पुष्पहार अर्पण मोठ्या अभिमानाने साजरी करण्यात आली. आम्ही काही कमी नाही या उक्तीप्रमाणे आदिवासी दुर्गम भागातील सावित्रीच्या लेकी, विद्यार्थी व शिक्षक यांनी […]

राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री – सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. […]

“तो” व्हिडिओ इगतपुरीचा नाही!

इगतपुरीनामा न्यूज दि. ०१ : आज दिवसभर सोशल मीडिया मध्ये एक गारपिटीचा व्हिडिओ शेअर केला जातो आहे. बऱ्याच ठिकाणी तो व्हिडिओ इगतपुरीचा असल्याचा उल्लेख केला जातो आहे. आम्ही वाचकांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की तो व्हिडिओ इगतपुरीचा नाही. पुन्हा एकदा सर्वांनी ध्यानात घ्यावे, तो व्हिडिओ इगतपुरीचा नाही. सध्या सगळीकडेच पाऊस सुरू आहे, त्यामुळे गारपीट होवू […]

error: Content is protected !!