शिवसेना, आगरी सेना आणि जनता ह्या त्रिवेणीसंगमातून उपसभापती पदाचा आशीर्वाद लाभला : उपसभापती विठ्ठल लंगडे
इगतपुरीतल्या मातीतल्या कार्यकर्त्यांचा सन्मान असल्याचा मान्यवरांचा सूर

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ काळूस्ते गणातील तमाम नागरिकांचा आशीर्वाद आणि शिवसेना, आगरी सेना यांची अनमोल मदत ह्या त्रिवेणीसंगमातून उपसभापती पदापर्यंत मजल मारता आली. मी सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो. आगामी काळात संपूर्ण इगतपुरी तालुक्यातील विकासासाठी जीव ओतून काम करीत राहील असे अभिवचन नवनिर्वाचित उपसभापती विठ्ठल लंगडे यांनी दिले. उपसभापती पदावर निवड झाल्यानंतर ते सत्काराला उत्तर देताना […]

लोकांमध्ये विठ्ठल पाहणारे विठ्ठल लंगडे झाले इगतपुरी पंचायत समितीचे उपसभापती

संत एकनाथांना गाढवात देव दिसला कारण ते स्वतः देव होते. आमच्या विठ्ठलाला सुद्धा माणसांत देव दिसतो. आईवडिलांच्या संस्कारी शिकवणुकीतून जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी विठ्ठल लंगडे ह्या तरुणाला मिळाली. ह्यातूनच त्याने इगतपुरी तालुक्यातील अनेक गोरगरिबांचे प्रश्न लीलया सोडवले. लोकांमध्ये विठ्ठल पाहणारा विठ्ठल लंगडे पंचायत समितीच्या उपसभापतीपदी विराजमान झाले आहेत. विठ्ठल भगीरथ लंगडे हे तळोघ ह्या अतिशय […]

इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा आणि ट्रामा केअर सेंटर सुरू करावे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांना निवेदन

शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ इगतपुरी तालुक्यातील आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी ग्रामीण रूग्णालय आहे. शहराजवळ मुंबई आग्रा महामार्ग, रेल्वे स्थानक, तालुक्याचे विविध शासकीय निमशासकीय कार्यालये असुन ग्रामीण भागातील अनेक खेडे पाडे व वाड्या वस्त्यातील रूग्णांना या ठिकाणी उपचार मिळतो. म्हणुन तालुक्याच्या केंद्रस्थानी असलेल्या ग्रामीण रूग्णालयालगत असलेल्या इमारतीत ट्रामा केअर सेंटर चालू करावे या मागणीचे […]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इगतपुरी तालुका उपाध्यक्षपदी अशोक पिंगळे यांची नियुक्ती : तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, गोरख बोडके यांनी दिले नियुक्तीपत्र

इगतपुरीनामा न्यूज, दि. १ इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी पारदेवी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अशोक जेठू पिंगळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इगतपुरी तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इगतपुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब  गाढवे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी ही नियुक्ती केली. इगतपुरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त तालुका […]

आगामी काळात युवकांची भूमिका निर्णायक ठरणार – ना. बाळासाहेब थोरात

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केली. त्यात नाशिकला झुकते माप मिळाले. राज्य कार्यकारिणीत सर्वांत तरुण ग्रामीण चेहरा इगतपुरी येथील भास्कर गुंजाळ यांचा चिटणीस म्हणून समावेश झाला.गुंजाळ यांचा सत्कार महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संगमनेर येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. त्याप्रसंगी ना. थोरात यांनी युवकांची […]

पहिल्या टप्प्यात नाशिकसह राज्यातील 15 जिल्हा बँकांची निवडणूक : मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर

निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ महाराष्ट्रातील 15 जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्यास परवानगी मिळाल्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाने मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र त्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट कायम आहे. या बँकांच्या अंतिम मतदार याद्या 27 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मात्र मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर किमान एक महिन्याच्या कालावधीनंतर […]

संतापलेल्या मनसेकडून “खळ् खट्याक्”चा अल्टीमेटम : चार दिवसात महामार्ग दुरुस्तीसाठी टोलनाका बंदचा मनसे पदाधिकाऱ्यांचा इशारा

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ मुंबई आग्रा महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली असुन  महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे लहान मोठ्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघातही  होत आहेत. यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यासाठी आज नाशिक जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. मनसेचे प्रदेश […]

मुरंबी गडगडसांगवी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जया मते बिनविरोध

विकास शेंडगे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ इगतपुरी तालुक्यातील मुरंबी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जया रेवन मते यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुरंबी येथील उपसरपंच निवडीची बैठक सरपंच संगीता मते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जया रेवन मते यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे जया रेवन मते यांची उपसरपंचपदी निवड झाली.मावळत्या उपसरपंच मनिषा दत्तु मते यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्यानंतर […]

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकात युवकांना संधी द्या : गृहनिर्माणमंत्र्यांकडे मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये युवकांना संधी द्यावी अशी मागणी इगतपुरी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे इगतपुरी येथे आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्यांचे स्वागत करत युवकांना संधी देण्याची मागणी केली असून त्यांनी देखील यावेळी सकारात्मक भूमिका घेत युवकांना आश्वासन दिले. […]

कुऱ्हेगावच्या उपसरपंचपदी सुरेखा बाळू धोंगडे बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ कुऱ्हेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी आज विशेष बैठक घेण्यात आली. अत्यंत खेळीमेळीत पार पडलेली ही निवडणूक बिनविरोध पार पडली. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजाराम नाठे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बिनविरोध निवडीचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. कुऱ्हेगावचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली. एकमेव अर्ज आल्याने उपसरपंचपदी सुरेखा बाळू धोंगडे यांची बिनविरोध […]

error: Content is protected !!