इंदिरा काँग्रेसच्या इगतपुरी तालुका उपाध्यक्षपदी लकीभाऊ गोवर्धने यांची निवड : इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात निवडीचे स्वागत

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

इगतपुरी तालुका काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी युवानेते लक्ष्मण उर्फ लकीभाऊ गोवर्धने यांची निवड करण्यात आली आहे. इंदिरा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, लोकनेते संदीप गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष काँग्रेस रमेश जाधव यांनी लकीभाऊ गोवर्धने यांना नियुक्तीपत्र दिले. ह्या निवडीमुळे इगतपुरी तालुक्यातील युवकांनी आनंद व्यक्त केला आहे. पक्षाच्या माध्यमातून लोकसेवा करण्यासाठी नेहमीच बांधील असल्याचे लकीभाऊ गोवर्धने यांनी सांगितले. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, काँग्रेस नेते संदीप गुळवे, माजी सभापती गोपाळ लहांगे, शिवराज गुळवे, सचिन गोवर्धने, प्रतीक गोवर्धने, आकाश दिवटे, संपत काळे, पांडुरंग शिंदें, योगेश शेलार, समाधान शिंदे आदींनी लकीभाऊ गोवर्धने यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुका उपाध्यक्षपद हे जनसेवा करण्यासाठी मला लाभले आहे. या माध्यमातून आमचे नेते संदीप गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच चांगले काम उभे करण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार हिरामण खोसकर आदींच्या साहाय्याने जनसेवा सुरूच राहील.

- लकीभाऊ गोवर्धने, नूतन काँग्रेस तालुका उपाध्यक्ष

Leave a Reply

error: Content is protected !!