राष्ट्रवादी पुन्हा ..! भाजप नगरसेविकेसह विविध राजकीय पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश : इगतपुरी तालुक्यात सध्या राष्ट्रवादीचा चांगलाच बोलबाला

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

इगतपुरी तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांत सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वरचष्मा वाढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यातील सर्व भागात भक्कम स्थान निर्माण केले आहे. इगतपुरी शहरातही पक्षाचे प्राबल्य चांगलेच वाढले आहे. ह्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री पालकमंत्री ना. छगनराव भुजबळ याच्या उपस्थितीत इगतपुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आगामी ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इगतपुरी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज राष्ट्रवादीत झालेले प्रवेश महत्वाचे मानले जातात.

पक्षाध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, पालकमंत्री ना. छगनराव भुजबळ, प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील आणि पक्षाच्या विचाराधारेनुसार कार्य करू असा विश्वास पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घोटी बाजार समितीचे माजी संचालक अरुण पोरजे, इगतपुरीच्या भाजप नगरसेविका गीता मेंगाळ, माजी नगराध्यक्ष राजु पंचारिया, युवासेना शहराध्यक्ष आकाश खारके, वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष बंटी पगारे, एकनाथ शेंगाळ, राजु जाधव, अडसरेचे माजी सरपंच शिवाजी मोढें, विद्यमान सरपंच शालुबाई तेलम, कुर्णोलीचे उपसरपंच गुरुनाथ जोशी, माजी सरपंच बाळु जोशी, विलास जोशी, राजु जोशी, सदस्य वनिता जोशी, ग्रामपंचायत सदस्य मदन तेलम, वाळु भाऊ तेलम आदींनी प्रवेश केला. प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, फिरोज पठाण, रतन पाटील जाधव, शहराध्यक्ष वसीम सय्यद, महेश शिरोळे, माजी उपसभापती विष्णु चव्हाण, हरिष चव्हाण आदी पदाधिकारी हजर होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!