बालरोगतज्ज्ञाने केलेल्या साहसी प्रसुतीचा थरारक अनुभव : “डर के आगे जित है” याची आली प्रचिती

लेखक : डॉ. अविनाश गोरे, बालरोगतज्ञग्रामीण रुग्णालय घोटी, 7972426585 वाचकहो नमस्कार !गोष्ट थोडी मोठी आहे. धीराने वाचली तर रुची, आनंद आणि उत्सुकता वाटेल. आम्ही वैद्यकीय अधिकारी ड्युटीवर असतांना अनेक अडचणींना सामोरे जात असतो. रुटीन ओपीडी, आयपीडी, मेडिकोलीगल ( न्याय्य-वैद्यकीय ) केसेस, रस्ते अपघात, भांडण, मारामाऱ्यांच्या घटनेतील लोकांची वैद्यकीय तपासणी, आरोपी, कैदी यांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी, […]

महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे अधिवेशन नेमके कशासाठी ? : शिक्षक बांधवांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे घ्या जाणून

लेखन : निवृत्ती यशवंत नाठे, संपर्क 9921468812 लेखक नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष असून शिक्षकांच्या प्रश्नांवर त्यांचा दीर्घ अभ्यास आहे. ह्या लेखातील प्रत्येक शब्द आणि वाक्ये अतिशय महत्त्वाची असून राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नांवर बहुमोल उत्तरे ह्यातून मिळतील. महाराष्ट्रामध्ये प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन  शिक्षकांच्या संघटना कार्यरत आहेत. त्यापैकी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ही प्राथमिक […]

शिवरायांची आरती करू नका…!

लेखन : विनोद नाठे, शिवचरित्र व्याख्याते, 9890979097 काल एका लग्नाला गेलो होतो. तिथे चक्क छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली ! शिवराय पृथ्वीवरील सर्वोत्तम राजा आहेत देव नाही ! शिवरायांला देव म्हणून त्यांचे महत्त्व कमी करु नका ! त्यांना देव बनवू नका ! त्यांचे दैवती करण करू नका. त्यांचे दैवती करण झाले तर त्यांचा पराक्रम चमत्कार […]

कार्यकुशल बंधू – नामदार बाळासाहेब थोरात साहेब…!

लेखन : सौ. दुर्गा सुधीर तांबे, मा. नगराध्यक्षा संगमनेर, संपर्क ९८२२५५३२५४ महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगामधील “अकोले” तालुक्यातील कळसुबाईच्या कुशीत उगम पावणार्‍या अमृतवाहिनी “प्रवरा” नदीच्या तीरावर संगमनेर तालुक्याच्या पूर्वेला “जोर्वे” हे गाव आहे. या गावाला मोठी ऐतिहासिक आध्यात्मिक परंपरा आहे. श्री क्षेत्र दत्त महाराजांचे पुरातन मंदिर प्रवरा नदीच्या काठावर आहे. जोर्वे […]

ऋषीतुल्य व्यक्तिमत्व : मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

गोष्ट आहे इथली भारतातलीच जेव्हा इथं इंग्रजांचं राज्य होतं.. कुठल्यातरी लोहमार्गावर प्रवाश्यांनी खच्चून भरलेली रेल्वे चालली होती आणि प्रवाश्यात काही मोजक्या भारतीयांसोबत बरेचसे इंग्रज मंडळीही होते.. त्या रेल्वेच्या एका डब्यात साध्या पोशाखातला एक सावळासा शिडशिडीत तरुण प्रवासी शांतपणं खिडकीबाहेरचा निसर्ग न्याहाळत होता.. त्या तरुणाचं रंगरूप आणि कपडे बघून त्याला अडाणी समजणारे काही इंग्रज प्रवासी आपसात […]

मैत्री दिनानिमित्त : बांधुया मैत्रीच्या नात्याला ; विश्वासाच्या परंपरेला

लेखक – शशिकांत भगवान तोकडे, घोटी काय बोलावं या मैत्रीबद्दल ? कधी आयुष्यात हरलो तर जिंकायला शिकवते तर कधी जिंकलो तर त्यात हरणाऱ्याचे दुःख वाटून घ्यायला शिकवते. तर पुन्हा नव्याने जगायला शिकवते ती ही मैत्री…!  खूप व्याख्या आहेत या मैत्रीच्या पण माझ्या मते मैत्रीची ओळख म्हणजे ”विश्वास”. मैत्रीचं दुसरं नाव म्हणजे विश्वास. मित्राच्या गाडीवर मागे […]

साजरा करा असाही आगळा पितृ दिन

मार्गदर्शक : डॉ. कल्पना श्रीधर नागरे, मानसशास्त्रज्ञ वडील म्हणजे उंबराचं झाड असतं,लपलेल्या भावनांचं जणू खोड असतं.. आईवडीलांबद्दल कितीही बोलले तरी ते कमीच आहे. दोघेही आपल्या मुलांना वाढविण्यासाठी मोठे करण्यासाठी, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेत असतात. त्यासाठी स्वतःच्या आवडीनिवडी इच्छा यांना मुरड घालतात. म्हणून आईवडील यांचे ऋण व्यक्त करायला अमेरिकेत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन […]

जगण्याची कोणतीही व्याख्या असत नाही !

– पुरुषोत्तम आवारे पाटीलदै. अजिंक्य भारत, अकोलासंवाद – 9892162248 व्यापाराच्या क्षेत्रात विक्रीसाठी कशाचाही प्रचार, प्रसार केला जाऊ शकतो. वस्तू, उत्पादन, संकल्पन आणि ज्ञान यांना विक्रीसाठी ठेवले जाऊन त्यासाठी ग्राहकांची झुंबडही उडत आहे. प्रेरणादायी वक्ते बाजारात ज्ञान विक्रीसाठी ठेवत आहेत. त्यातून लोकांना जगण्याची कला शिकविण्याचा मोठा बाजार सुरू आहे. अध्यात्मिक क्षेत्रात रविशंकरसारखे स्वयंघोषित गुरूही ‘आर्ट ऑफ […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २

दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता प्रत्येक पालकाला असते. त्यासाठी प्रत्येकाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शक लाभावा लागतो. आता पालकांनी चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील यशवंत विद्यार्थ्यांची मोठी फौज घडवणारे स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक प्रा. देविदास गिरी आपल्याला नियमित मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी इगतपुरीनामा वेब पोर्टलला नियमित भेट देत राहा..! – भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा वेब […]

जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे तब्बल अठ्ठावीस बोलीभाषांमध्ये अनुवाद : ‘माझी मायबोली’ समूहाकडून ऑनलाईन फ्लिपबुकची निर्मिती

इगतपुरीनामा विशेष : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कवी राजा नीलकंठ बढे यांनी रचलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचे राज्यातील विविध भागात बोलल्या जाणाऱ्या स्थानिक बोली भाषांमध्ये अनुवाद केलेल्या फ्लिप बुक इ-पुस्तकाचे महाराष्ट्र दिनी ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. चाळीसगाव येथील प्राथमिक शिक्षक नितीन खंडाळे यांनी राज्यभरातील विविध बोलीभाषेतील अनुवादकांना सोबत घेऊन हा उपक्रम सुरू केला […]

error: Content is protected !!