बालरोगतज्ज्ञाने केलेल्या साहसी प्रसुतीचा थरारक अनुभव : “डर के आगे जित है” याची आली प्रचिती

लेखक : डॉ. अविनाश गोरे, बालरोगतज्ञ
ग्रामीण रुग्णालय घोटी, 7972426585

वाचकहो नमस्कार !
गोष्ट थोडी मोठी आहे. धीराने वाचली तर रुची, आनंद आणि उत्सुकता वाटेल. आम्ही वैद्यकीय अधिकारी ड्युटीवर असतांना अनेक अडचणींना सामोरे जात असतो. रुटीन ओपीडी, आयपीडी, मेडिकोलीगल ( न्याय्य-वैद्यकीय ) केसेस, रस्ते अपघात, भांडण, मारामाऱ्यांच्या घटनेतील लोकांची वैद्यकीय तपासणी, आरोपी, कैदी यांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी, पोस्को-कायदा, कलम ३७६ अंतर्गत आरोपी व पीडितांची तपासणी, लसीकरण ओपीडी, गरोदर माता तपासणी, कॉपर टी, एमटीपी induction,अति-दक्षता केंद्र (आयसीयू ) लागणारे गंभीर रुग्ण, क्रिटिकल पेशंट्स, नवजात शिशु व बालरुग्ण तपासणे आदी ही सर्व कामे एका विशिष्ट आणि गॉड-गिफ्टेड यंत्रणेने करावी लागतात. ग्रामीण रुग्णालयात काम करत असतांना ही कामे फिट करणे हे Compulsory असल्यासारखे आम्ही कार्य करत असतो. हे करतांना आयुष्यातील कधीच न थांबणारी प्रोसेस म्हणजे प्रसूती, डिलिव्हरी… ह्यांची आमच्या रुग्णालयात कायम रेलचेल असते.

खासगी रुग्णालयातील डॉक्टर आपल्याकडे रुग्ण जास्तीत जास्त यावे म्हणून वाट पाहत असतात अन् सरकारी रुग्णालयातील डॉक्टर हे कमीत कमी रुग्ण यावे अशी नकळत अपेक्षा करत असतात. परंतु डॉक्टर जे मनाशी स्वप्न बाळगतात ते फार कमी डॉक्टरांची पूर्ण होतात. त्यामुळे आम्ही त्या बाबतीत कम-नशिबी म्हणायला हरकत नाही. ड्युटी खूप बिझी जात असेल तर ती पण सत्वपरिक्षा घेतल्यासारखी सूडच उगवते. पण गेल्या साडेतीन वर्षांपासून घोटी ग्रामीण रुग्णालयात काम करतांना त्या बिझी ड्युटीचा आनंद आणि सगळ्यांना चांगल्यातली चांगली ट्रीटमेंट देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आजचा किस्सा म्हणा किंवा घटना म्हणजे डर के आगे जित है याचे उदाहरण म्हणावे लागेल. परत प्रायमी-ग्रेव्हीडा प्रथम प्रसूती, शेवटची सोनोग्राफी ही अगदी सुरुवातीच्या दुसऱ्या महिन्यात केलेली. त्यानंतर परत एकही सोनोग्राफी न केलेली, जेमतेम ब्लड रिपोर्ट्स सोबत असलेली,आली तेंव्हा तिला खेड नावाच्या गावांत घरी, कुठल्या तरी रुग्णालयात डिलिव्हरी होण्यासाठी प्रयत्न झालेले होते. ती आज आमच्याकडे साधारण सकाळी साडेआठच्या सुमारास आली होती. आली तेंव्हा तिचे Pv Dilatation हे जवळजवळ 10 cm होते.  तिला प्रसूती कळा मध्यम स्वरूपाच्या होत्या. हेड स्टेशन वगैरे जे म्हणतात ते अजून वर होतं अथवा झीरो डिग्रीच्या जवळ होतं. अशा डिलिव्हरीज ह्या सहसा एका बालरोगतज्ञाने अथवा कुठल्याही वैद्यकीय अधिकाऱ्याने असाहसी धाडस न करता पुढच्या सेंटरला अथवा हायर सेंटरला रेफर करणे गरजेचे असते. पण मी सुरुवातीलाच म्हटलं की काम करत असतांना एक अद्भुत ऊर्जा संचारत असते. आपला पिंड हा डर के आगे जित है प्रमाणे मी आपल्या सहकार्यांना एकच इशारा केला की ही डिलिव्हरी आपल्याला इथेच करायची अन् पुढे कुठं पण पाठवायची नाही.

मग काय..! परत तेच Prolonged Labour, Non-Progression-,foetal distress, meconium stained liquor हे सगळं अनुभवल्याने परत लॉंग episiotomy व आदी आपल्या नेहमीच्या tactices like uterine massage वगैरे दिली. नित्यनियमाने ठरल्याप्रमाणे आपल्या भित्याच्या मागे ब्रम्हराक्षस प्रमाणे डॉक्टरांच्या मागे cord around neck हे लिखित होतं. यावेळपर्यंत आम्ही पिटोसीन इंजेक्शनचे 10 युनिट्स हे ड्रीपमध्ये टाकले होते,
ज्यावेळी मला FHS लागले नाहीत. त्यावेळी मात्र मी गडबडलो. अन् मी आमचे प्रिय मित्र डॉ. दत्तू पगारे यांना कॉल केला. त्यांनी क्षणांचाही विलंब न करता आमचे प्रिय मित्र डॉ दिगंबर चौरे यांना एक देवदूत म्हणून आमच्याकडे पाठवले. त्यांनी सोबत ventauz अशी मशीन की जी बाळाचे डोके हे catch करून प्रेशरच्या मदतीने बाळाच्या डोक्यावर लावून बाळ आतमधून बाहेर काढण्यासाठी मदत करते. ते मशीन घेऊन ते अगदी ५ मिनिटांत दाखल झाले. त्यांनी पूर्ण केसचा अभ्यास करून डिलिव्हरी करण्यासाठी आम्हांला अगदी मनापासून सर्वतोपरी मदत केली आणि बाळ हे बाहेर आले,
आल्यानंतर बाळ हे जिवंत आहे की नाही इथपर्यंत आम्ही चिंताग्रस्त होतो. पण लगेचच माझ्यातला बालरोगतज्ञ जागा झाला अन् आम्ही सगळे मिळून त्या बाळाला आमच्या प्रोटोकॉल्स नुसार PSSR ( Position, Suction, Stimulation आणि Reposition हे दिले. बाळाला काही वेळ ऑक्सिजन आणि अगदी काही breaths हे बॅग अँड मास्कने दिले, पण हे सगळं केल्यानंतर बाळ अगदी व्यवस्थित.
ह्यावेळेस आम्हाला मदत करायला सोबत रुपाली वाघमारे व शीला गावित, डॉ. किरण कानवडे हे सगळे  होते. त्यांनी सुद्धा खूप मदत केली.

आईचा मात्र बीपी फॉल झाल्या कारणाने आम्हाला तिला inotropes लावावे लागले. तिच्या नाडीचा वेग कमी झाला पण अगदी २ ते ३ iv NS मध्ये तीअगदी नॉर्मल मध्ये आली.
नंतर बारकाईने पाहिल्यानंतर तिला cervical tear आणि बाकीचे पण बरेच खोलवर tears गेले होते. हे सगळे tears शिवण्याची जबाबदारी अनिकेत गावकर ब्रदर यांनी चोख पार पाडली. आणि सगळं काही सुखकर पार पाडलं. ह्या कामात
डॉ. दिगंबर चौरे, डॉ. दत्तू पगारे, समस्त पवन चॅरिटेबल हॉस्पिटल घोटी, डॉ. किरण कानवडे, रुपाली वाघमारे स्टाफ, शीला गावित स्टाफ, अनिकेत गावकर स्टाफ, जगताप मावशी आदींनी बहुमोल साहाय्य केले. यामुळेच “डर के आगे जित है” ह्याची आम्हाला प्रचिती येऊ शकली.
 

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!