बिबट्यांनी जणू इगतपुरी तालुकाच दत्तक घेतलाय की काय ? : इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या रोजच्या दर्शनाने घबराट कायम

निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते भागात सलग दोन दिवस बिबट्याने हल्ले केल्यानंतरही तालुक्यात दररोज कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे बिबट्यांनी जणू इगतपुरी तालुकाच दत्तक घेतलाय की काय ? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. बिबट्यांची संख्या अचानक वाढल्याने इगतपुरी तालुक्यातील विविध भागांत ऐन सणासुदीच्या काळात भयग्रस्त परिस्थिती निर्माण […]

काळुस्ते भागातील नरभक्षक होण्याच्या वाटेवर असणाऱ्या बिबट्याला तातडीने जेरबंद करा : उपसभापती विठ्ठल लंगडे यांची मागणी

पीडित आदिवासी कुटुंबांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी दिला शब्द इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ इगतपुरी तालुक्याच्या काळुस्ते भागात नरभक्षक होण्याच्या दिशेने बिबट्या वाटचाल करीत आहे. ह्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात नुकतेच एक निष्पाप बालक ठार झाले. एक बालक जखमी असून यापूर्वी सुद्धा बऱ्याच व्यक्तींवर बिबट्याचा हल्ला झालेला आहे. वन खात्याच्या अकार्यक्षमतेमुळे जंगलतोड, अवैध भट्ट्या असल्यामुळे हिंस्त्र प्राणी मानवी […]

बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या जनतेला तातडीने दिलासा द्या : सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांची मागणी

दरेवाडी येथील बिबट्याच्या हल्ल्यातील मृत बालकाच्या कुटुंबाला दिला आधार इगतपुरीनामा न्यूज, दि. २० इगतपुरी तालुक्यात बिबट्याचा हैदोस वाढत असून यामुळे निरपराध नागरिक आणि बालकांचे हकनाक बळी जात आहेत. झालेली हानी कशानेही भरून निघणारी नाही. यामुळे अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी वन विभागाने डोळ्यांत तेल घालून प्रभावी नियोजन करावे. दरेवाडी येथील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालकांच्या कुटुंबाला […]

बिबट्याच्या हल्ल्यात ६ वर्षीय मुलगा जखमी : काळुस्ते परिसरात वन विभागाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू

इगतपुरीनामा न्यूज, दि. २० इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते या गावी मंगळवारी रात्री बिबट्याने हल्ला केल्यामुळे ६ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मुलाच्या आईने आरडाओरडा केल्यामुळे बिबट्यांच्या तावडीतून त्याची सुटका झाली. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर याठिकाणी वनविभागाने आता कडक पावले उचलली आहे. जिल्ह्यामध्ये बिबट्याचे हल्ले हे सुरूच आहेत. अगदी चार […]

इगतपुरीत बिबट्याच्या मुक्तसंचाराने नागरिकांत भितीचे वातावरण : वन विभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ इगतपुरी शहरातील चर्च हिल, कॉन्व्हेंट हायस्कूल परिसरात बऱ्याच दिवसांपासून परिसरातील नागरिकांना बिबट्याचे दर्शन नित्याचेच झाले आहे. ह्या परिसरातील कुत्र्यांची संख्याही कमालीची घटली आहे. या परिसरात शाळाही असून नागरिक भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास बिबट्याचे पुन्हा दर्शन झाले आहे. बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. […]

error: Content is protected !!