इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
इगतपुरी तालुक्यात मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात हल्ले देखील होत आहे. तसेच काही नागरिकांना बिबट्यांचा हल्ल्यात आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तालुक्यात सर्वच ठिकाणी भात सोंगण्या सुरू असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने तालुक्यात बिबटे संचार क्षेत्रात पिंजरे लावून नरभक्षक बिबट्यांना तातडीने जेरबंद करावे असे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका उपाध्यक्ष मदन कडू, वसीम सय्यद, माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, महेश सुरुळे, अनिल पढेर, नारायण वळकंदे, प्रवीण कदम, ज्ञानेश्वर पासलकर, बळवंत हिंदोळे, सुहास बर्वे आदी उपस्थित होते.