इगतपुरी तालुक्यातील बिबट्यांची दहशत कमी करावी : आमदारांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाची अधिकाऱ्यांशी चर्चा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६

इगतपुरी तालुक्यात विविध भागात सुरू असलेल्या बिबट्याच्या दहशतीबाबत आवश्यक उपाययोजना या विषयावर चर्चा करण्यासाठी इगतपुरी त्र्यंबकेश्र्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने वन अधिकाऱ्यांना भेटून सविस्तर चर्चा केली. आमदारांचे स्विय सहाय्यक संदीप डावखर यांनी इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांची भेट घेतली. आजपर्यंत बिबटे पकडण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कशा पद्धतीने केल्या, नागरिकांमध्ये जनजागृती कशा पद्धतीने करत आहात, आपण लवकरात लवकर  बिबटे जेरबंद कसे करणार आहात ? याबद्दल साधकबाधक चर्चा झाली. लवकरात लवकर बिबट्यांना पकडून तालुक्यातील नागरिकांच्या मनातील भीतीचे वातावरण दूर करावे असे सांगण्यात आले. यावेळी अखिल भारतीय आदिवासी संघटनेचे  युवा नेते राजू गांगड, इगतपुरी युवक काँग्रेस शहरप्रमुख भाबु भाई कवटे, ज्येष्ठ नेते दौलत बोंडे,दिलीप हाडप, युवा नेते संतोष कदम, ज्येष्ठ पत्रकार भास्कर सोनवणे, वाल्मीक गवांदे यांनी चर्चेत भाग घेतला. यावेळी इगतपुरी तालुक्यातील सर्व वन परिमंडळ अधिकारी उपस्थित होते

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!