प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख भागात तब्बल ४ बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे. वनविभाग मात्र सुस्तावले असल्याचा आरोप नागरिकांमधुन होत आहे. हिवरमाथा शिवारात आठवड्यापासून बिबट्यांच्या मुक्त संचाराने नागरिक भयभीत आहेत. या शिवारातील कुत्रे, पाळीव प्राणी यांना बिबट्याने भक्ष्य […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथील तीन दिवसापुर्वी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी प्रविण सारूक्ते वय ११ ह्या बालकाचा आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याची प्राण ज्योत मालवली. नाशिकच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. तीन दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या १३० अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक करीत शोध घेतला. मात्र अजूनही बिबट्या जाळ्यात अडकला नाही. […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन परिसरात गुरुवारी एका मुलावर बिबट्याचा हल्ल्याची घटना घडली होती. आज सकाळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पिंजरा लावण्यासाठी गेले असता ह्या बिबट्याने वनरक्षकांवर हल्ला केला आहे. यामध्ये ग्रामस्थांसह जवळपास दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ घोटी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथे बिबट्याच्या हल्यात ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. यावेळी बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला. प्रवीण सारुक्ते असे जखमी झालेल्या नाव असून ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. प्रवीण सारुक्ते हा आपल्या घरापासून दोनशे मिटर अंतरावर असलेल्या शेतात आई वडिलांबरोबर गेला असता उसाच्या शेतात दबा धरून असलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बिबट्याच्या शिकार प्रकरणात आज इगतपुरी वन विभागाच्या पथकाकडून शोधकार्य करण्यात आले. पिंपळगाव मोर येथील मोराचा डोंगर येथे शिकार झालेल्या जंगल परिसरात सकाळी ९ पासून दुपारी २ वाजेपर्यंत बिबट्या आणि अन्य वन्यप्राण्याच्या इतर अवयवांचा शोध घेण्यात आला. ह्या शोधमोहीमेत वन विभागाचा कडक खाक्या दाखवल्यानंतर आरोपींच्या घरातून प्राण्याच्या हाडांचे अवशेष मिळाले आहेत. […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील गिऱ्हेवाडी येथील एका घरामध्ये बिबट्या शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. बिबट्या घरामध्ये शिरला त्यावेळेला कुटुंबातील पाच सहा जण घरामध्ये होते. बिबट्याला पाहून घरातील सदस्यांनी घराच्या बाहेर पळ काढला. तातडीने दरवाजा लावून घेतल्याने बिबट्याला घरामध्ये बंदिस्त करण्यात यश आले आहे. इगतपुरी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले असून […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगर दऱ्या, धरणे, नदी नाल्यांनी व्यापलेला असून ह्या ठिकाणांवर वन्यप्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. या परिस्थितीत डोंगराळ भागातील काही संशयित इसम अल्पावधीत पैसे कमवण्यासाठी अवैध व्यवसाय करीत असतात. नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी सत्वर कारवाई करण्याचे आदेश […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत चालली असून बिबट्याच्या हल्ल्यात आज ३१ वर्षीय तरुणी ठार झाली आहे. निशाणवाडी ( त्रिंगलवाडी ) येथील ही दुर्दैवी तरुणी आहे. या घटनेमुळे ह्या भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मीनाक्षी […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील धार्णोली येथे बिबट्याने विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बिबट्याशी झुंज देणारा योगेश रामचंद्र पथवे हा दहावीत शिकणारा विद्यार्थी आहे. योगेशचे शाळकरी मित्र प्रविण, निलेश, सुरेश यांच्यासह घरातून शाळेच्या दिशेने जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. समयसूचकता दाखवत योगेशने प्राणाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत मित्रांना […]
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – काही दिवसांपूर्वी मुकणे कॉलनी येथील उपसरपंच भास्कर राव यांच्या घराजवळील पडवीत असलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती. वन विभागाकडुन बिबट्या जेरबंद झालेला नसुन त्याने आता कुत्रे, वासरे यांच्यावर हल्ला करीत आहे. ठार करीत आहे. आज पहाटे मारुती राव यांच्या टोमॅटो पिकात बिबट्याने पिकांची चांगलीच नासाडी […]