
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथे बिबट्याच्या हल्यात ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. यावेळी बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला. प्रवीण सारुक्ते असे जखमी झालेल्या नाव असून ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. प्रवीण सारुक्ते हा आपल्या घरापासून दोनशे मिटर अंतरावर असलेल्या शेतात आई वडिलांबरोबर गेला असता उसाच्या शेतात दबा धरून असलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. आई वडिलांनी आरडा ओरडा करून बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे बिबट्याच्या तावडीतून हा मुलगा वाचला मुलाला वाचविले मात्र जाता जाता बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला. प्रवीण गंभीर जखमी असून त्याला घोटी येथील खासगी दवाखान्यात येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इगतपुरीचे प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाफ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे.