नांदगाव बुद्रुक शाळेजवळ बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने लावला पिंजरा

इगतपुरीनामा न्यूज – नांदगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळे शेजारी ऊसाच्या शेतात बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष गायकर, मुख्याध्यापक बलसिंग परदेशी यांनी गुरुवारी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी इगतपुरीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कांचन भुसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी दत्तू भोये, वनरक्षक सचिन गवळी यांनी तात्काळ पिंजरा बसवला. शालेय समिती अध्यक्ष सुभाष गायकर यांनी वनविभाग परिमंडळ अधिकारी दत्तू भोये यांच्याशी संपर्क साधल्यामुळे तातडीने पिंजरा लावण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन उपाध्यक्ष सुभाष अशोक पागेरे, सुकदेव गायकर, परशराम गायकर, हिरामण गायकर, बाळू शिरसाठ, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. जि. प. शाळेजवळ लावलेल्या पिंजऱ्याजवळ लहान मुलांनी किंवा इतर नागरिकांनी जाणे धोकादायक असल्याने त्या ठिकाणी जाऊ नये. विद्यार्थ्यांना याबाबत सूचना देऊन सतर्क राहण्यास सांगावे असे आवाहन वनपरिमंडळ अधिकारी दत्तू भोये यांनी केले आहे.

error: Content is protected !!