बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षक आणि ग्रामस्थ जखमी ; नाशिकची टीम घटनास्थळी दाखल

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन परिसरात गुरुवारी एका मुलावर बिबट्याचा हल्ल्याची घटना घडली होती. आज सकाळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पिंजरा लावण्यासाठी गेले असता ह्या बिबट्याने वनरक्षकांवर हल्ला केला आहे. यामध्ये ग्रामस्थांसह जवळपास दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ घोटी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या हल्ल्ह्यात वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, वनरक्षक फैजअली सैय्यद, चिंतामण गाडर, कैलास पोटींदे, गोरख बागुल यांच्यासह उंबरकोन येथील चार ते पाच ग्रामस्थ जखमी झाले. काल बिबट्याच्या हल्ल्यात प्रवीण सारुक्ते हा मुलगा गंभीर जखमी झालेला आहे. इगतपुरीचे प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला पकडण्यासाठी आज सकाळी रेस्कु ऑपरेशन राबवण्यात आले. घटनास्थळी दोनशे ते तीनशे ग्रामस्थांनी गर्दी केल्यामुळे या बिबट्याने कर्मचाऱ्यांसह पाच ग्रामस्थांवर हल्ला करीत जखमी केले. अखेर या बिबट्याला पकडण्यासाठी नाशिक येथील टीमला पाचारण करण्यात आले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!