दिवाळी धमाका – साकुर फाट्यावरील ‘सई कलेक्शन’मध्ये ग्राहकांची तुफान गर्दी : दिवाळी ऑफर्स आणि ‘फॉरेन टूर’ ऑफरमुळे ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद 

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – दिवाळीच्या सुवर्णपर्वानिमित्त कपड्यांच्या खरेदीसाठी इगतपुरी तालुक्यातील साकुर फाटा येथील अत्यंत लोकप्रिय आणि भव्य दालन असणाऱ्या ‘सई कलेक्शन’मध्ये ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. “स्वस्त, मस्त, भारदस्त आणि दर्जेदार” या आपल्या खास ओळखीने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात नावाजलेल्या सई कलेक्शनने यंदाच्या दिवाळीत ग्राहकांसाठी अदभूत ऑफर्सची खैरात केली आहे. ‘सई म्हणजे स्वस्ताई’ आणि भव्य व्हरायटी! – एक दिवसाच्या चिमुकल्या बाळापासून ते आबालवृद्धांपर्यंत, तसेच महिला व पुरुषांसाठी सर्व प्रकारच्या कपड्यांचे अथांग भांडार येथे उपलब्ध आहे. पारंपरिक साड्या, डिझायनर ड्रेसेस, वेस्टर्न वेअर, लहान मुलांचे आकर्षक कपडे आणि विविध ब्रँडेड कपड्यांची मुबलक व्हरायटी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘सई म्हणजे स्वस्ताई’ हे ब्रीदवाक्य जपत दर्जेदार कपडे अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करून दिल्यामुळे सई कलेक्शन हे संपूर्ण जिल्ह्याचे आकर्षण ठरत आहे. २१ हजारांच्या खरेदीवर ‘मलेशिया फॉरेन टूर – यंदाच्या दिवाळीत सई कलेक्शनने ग्राहकांसाठी एक खास आणि बंपर ऑफर आणली आहे. तब्बल २१ हजार रुपयांच्या खरेदीवर मलेशियाची फॉरेन टूर जिंकण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळत आहे. या भरघोस सवलती, दिवाळी ऑफर्स आणि परदेशी प्रवासाच्या धमाकेदार ऑफरमुळे परिसरातीलच नव्हे तर परतालुक्यातील ग्राहकही इथे गर्दी करत आहेत. एसएमबीटी रुग्णालयात तपासणीनिमित्त आलेले चिंतामणी जोशी म्हणाले की, “येथील नम्र कर्मचारी, कपड्यांचा उत्तम दर्जा आणि अथांग व्हरायटी पाहून आम्ही थक्क झालो. आम्ही तब्बल १७ हजार रुपयांची मनासारखी खरेदी केली आहे. यापुढेही कपड्यांच्या खरेदीसाठी आम्ही नक्कीच सई कलेक्शनलाच प्राधान्य देऊ,” अशी प्रतिक्रिया चिंतामणी जोशी, अपर्णा जोशी, मुलगी अनघा जोशी आणि जावई निमिष पटवर्धन यांनी सई कलेक्शनचे संचालक अशोक सहाणे पाटील व कांचन सहाणे पाटील यांच्याशी बोलताना व्यक्त केली. अकोले तालुक्यातून आलेले पांडुरंग पानसरे म्हणाले की,”अकोले तालुक्यात सई कलेक्शनच्या दर्जेदार कपड्यांची आणि स्वस्त दरांची मोठी चर्चा ऐकली होती. म्हणूनच मी संपूर्ण कुटुंबासाठी—लहानांपासून मोठ्यांपर्यंत—तब्बल २७ हजार रुपयांच्या विविध कपड्यांची खरेदी केली. इथे आलेला प्रत्येक ग्राहक समाधानी होऊनच बाहेर पडतो.” सई कलेक्शनचे संचालक अशोक सहाणे पाटील आणि कांचन सहाणे पाटील यांच्या उत्तम व्यवस्थापनामुळे व ग्राहकाभिमुख सेवेमुळे सई कलेक्शनने नाशिक जिल्ह्यात खरेदीचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या दिवाळीत तुमच्या कुटुंबाची खरेदी खास आणि आनंदी करण्यासाठी आजच साकुर फाटा येथील ‘सई कलेक्शन’ला नक्की भेट द्या!

error: Content is protected !!