
इगतपुरीनामा न्यूज : बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणुकांना अखेर मुहूर्त लागला असून तो मुहूर्त नक्की कोणता असणार याबाबत शनिवारी सविस्तर माहिती मिळणार आहे. निवडणूक आयोगाचे जॉइंट डिरेक्टर (मीडिया) अनुज चांडक यांनी आजच याबाबत एक पत्र प्रसिद्ध केले असून उद्या (शनिवार) दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.