इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – इगतपुरी तालुक्यातील कावनई येथुन रायांबे गावाकडे शनिवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्याची घटना घडली आहे. मोटार सायकल वरून एक महिला व एक पुरूष अशा दोन अज्ञात व्यक्तीनी ही चोरी केल्याची लेखी तक्रार फुल्याबाई बहिरू धांडे, वय ६७ वर्षे रा. रायांबे ता. इगतपुरी यांनी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – मुंबई आग्रा महामार्गावरील टाके घोटी येथील पुलाजवळ पीकअप आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. ह्यामध्ये पीकअप वाहन उलटले असून ह्या वाहनाला आग लागल्याचे समजते. अपघातात २ जण जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र कैलास गतीर यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ – इगतपुरी येथील अप्रभाव मानस प्रोजेक्ट हॉटेलमध्ये एका व्यक्तीने आज आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आनंद गणपतराव शिंदे वय. 42 वर्षे धंदा. मॅनेजर रा. खालची पेठ इगतपुरी यांनी इगतपुरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. इगतपुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यू दाखल करून तपास सुरु केला आहे. चिराग विनोद राय वरैया वय अंदाजे 45 […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसदो चौफुलीवर मुंबईला गोमांस घेऊन जाणाऱ्या एका कारमध्ये गोमांस आढळुन आले. १ लाख ६० हजार रुपयाचे ८०० किलो गोमांस व ३ लाख ५० हजार रुपयाची कार असा एकुण ५ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. नाशिक मुख्यालयाच्या ग्रामीण पथकाने ही कारवाई केली. कार चालकाविरोधात […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ – घोटी शहरातील आगरी गल्ली येथील युवकाने राहत्या घरात आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. युवकाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. आत्महत्येचे कारण मात्र समजले नसून घोटी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. संतोष म्हसणे वय ३५ असे युवकाचे नाव आहे. घोटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास कार्य सुरु करण्यात आले […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ – नाशिकचे शालेय विद्यार्थी असलेल्या एका बसला इगतपुरी तालुक्यात अपघात झाला आहे. सर्वतीर्थ टाकेद भागात म्हैसवळण घाटात अपघाताची घटना घडली आहे. अपघातात ४ विद्यार्थी गंभीर तर ३ जण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. जखमींना धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असून बसचालकाने […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव भागातील एक अविवाहित गरोदर मुलगी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल आहे. त्या मुलीने गरोदर असल्याचा खुलासा केला. म्हणून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष येथील बळजबरी करून गरोदर करणाऱ्या युवकाचे नाव घेतले. याबाबत खात्री करण्यासाठी घोटी पोलिसांनी पोलीस पाटलाच्या मार्फत संबंधित तरुणाला संपर्क साधला. यामुळे घाबरलेल्या ह्या तरुणाने आपले जीवन संपवून […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे गावापासून अर्धा किलोमीटर दूरवर शिरसाठे येथील शाळकरी विद्यार्थी युवराज ज्ञानेश्वर सदगीर वय १०, कपिल काशिनाथ सोपनर वय १२ हे खेळण्यासाठी गेले होते. ह्या दोन बालकांना तिथून दोन अज्ञात व्यक्तींनी तोंड दाबून काळ्या स्विफ्ट गाडीत घातले. तिथून त्यांनी गाडी पुढे कुशेगावकडे नेली परंतु तिकडून […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – नांदगाव सदो, ता. इगतपुरी येथील भूषण गणेश भागडे वय २३ ह्या बेपत्ता युवकाचा मृतदेह आज सकाळी समृद्धी महामार्ग भागातील एका विहिरीत सापडला आहे. हा युवक १५ जानेवारीपासून बेपत्ता झाल्याबाबत इगतपुरी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे. नांदगाव सदो गावाजवळ एका विहिरीत हा युवक मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती इगतपुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ – महामार्गावर आणि बाजार पेठेत व्यापारी वर्गाला बोलण्यात गुंतवून भुरळ पाडत लुटणारी टोळी इगतपुरी, घोटी शहरात कार्यरत असल्याची चर्चा रंगली आहे. ही टोळी गोंदे, वाडीवऱ्हे या मोठ्या गावांमध्ये आणि महामार्गावरील व्यापाऱ्यांना लक्ष करत असल्याचेही नागरिक बोलत आहेत. या टोळीने शहराच्या मध्यवर्ती भागासोबतच मुंबई आग्रा महामार्गावरील दुकाने, छोटे हॉटेल्स, टपऱ्या यांना विशेष […]