काळूस्ते येथील ऐतिहासिक बोहडा ; परंपरा आणि श्रद्धेचा अखंड उर्जास्त्रोत

इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते गावाचा राज्यभर प्रसिद्ध असलेला बोहडा उत्सव.. ह्या उत्सवाच्या तयारीपासून समाप्तीपर्यंतच्या सोहळ्याचे वर्णन वाचले तर जणू आपणही त्यात सहभागी असल्याची प्रचिती येईल. शेवटपर्यंत नक्की वाचायला हवे. – भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा लेखन : उमेश बबनदास बैरागी, प्राथमिक शिक्षक बोहडा हा शब्द तसा आमच्या गावचा पण तो भोवाडा आहे. बोहडा उर्फ भोवाडा हा आता […]

रमजान, अक्षयतृतीया, संभाजी महाराज जयंतीच्या त्रिवेणी संगमावर कोरोना योद्धयांचा गौरव ; घोटीच्या कळसुबाई मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान सण, हिंदू बांधवांच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारी अक्षय तृतीया आणि हिंदूरत्न संभाजी महाराज जयंती हा त्रिवेणी संगम साधून घोटीच्या कळसुबाई मित्रमंडळाने कोरोना योद्धयांचा सन्मान केला. संस्थापक अध्यक्ष तथा प्रसिद्ध गिर्यारोहक भगीरथ मराडे यांच्या संकल्पनेनुसार इगतपुरी येथे कोविड नियमांचे पालन करून सोहळा संपन्न झाला. एक वर्षांपासून आपापल्या क्षेत्राच्या माध्यमातून […]

जनसेवा प्रतिष्ठानने केला परिचारीकांचा सन्मान

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ : आज परिचारिका (सिस्टर) दिनानिमित्त इगतपुरी ग्रामीण रुग्णालय आणि डेडीकेटेड कोवीड सेंटर येथे आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना सेवा देणाऱ्या परिचारीका वराडे सिस्टर, शेळके सिस्टर, इंगळे सिस्टर, बागुल सिस्टर, सपना सिस्टर तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वरुपा देवरे, डॉ. पूनम पाटिल, डॉ. शिल्पा थोरात आदींचा जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने […]

पहिलवान बाळू जुंदरेची पुन्हा एकदा गगनभरारी ; राष्ट्रीय पातळीवरील खेलो इंडिया स्पर्धेत झाली निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५इगतपुरी तालुक्यातील भरविर खुर्द गावातील गुणवंत पहिलवानाने पुन्हा एकदा आपल्या गावासह इगतपुरी तालुक्याचे नाव उंचावले आहे. कुस्ती या खेळाच्या माध्यमातून आपले कौशल्य आणि गुणवता त्याने सिद्ध केली आहे. देशभरात नामवंत झालेला पहिलवान कु. बाळू शिवाजी जुंदरे याने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यशाचे शिखर गाठले.नुकत्याच उत्तरप्रदेशातील नोएडा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील आखाडा आपल्या […]

तो पांडुरंग भक्तांसाठी तर आमचा “पांडुरंग” जनतेसाठी धावतो..!

लेखन – भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा इगतपुरी तालुक्याच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीचा मुद्ध्येसुद अभ्यास, पोटतिडकीने प्रश्न मांडण्याची हातोटी, जनसंपर्काचा प्रचंड फैलावलेला वटवृक्ष आणि कोणतंही काम पूर्ण होईपर्यंत स्वतःला बांधून घेणारं लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणजे पांडुरंग त्र्यंबकराव वारुंगसे. राजकारणात सक्रिय असूनही राजकारणातील दूषित फळांपासून अलिप्त राहून जनसामान्य लोकांना आश्वस्त करून शेकडो प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते सुप्रसिद्ध आहेत. पंढरीच्या […]

महाराष्ट्र गौरव गीत

श्रीमती वैशाली भामरेजि. प. शाळा माणकेता. मालेगाव, जि. नाशिकसंपर्क : 7447302081 महाराष्ट्र आपुले आहे महानआम्हास वाटे त्याचा अभिमानधर्म जात संस्कृतीने इथल्याभरलाय नसानसात स्वाभिमान मराठी आमुची बोलीभाषातिचा गोडवा आहे अपरंपारसह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांचीइतिहासात कीर्ती आहे फार कोकण खान्देश विदर्भ मराठवाडामहाराष्ट्राच्या आमुची आहे शानसाहित्य संस्कृती कला क्षेत्रालासाऱ्या देशामध्ये मोठा आहे मान क्रांतिकारी इतिहासा बरोबरदैदिप्यमान भविष्य आम्ही घडवतोमहाराष्ट्र देशा स्वाभिमानानेभारताचेही […]

मा. जि. प. सदस्य गोरख बोडके यांच्या आवाहनाला साद देऊन संवेदनशील मनाच्या आयएफएस अधिकारी अंकिता वाकेकर धावल्या इगतपुरीकरांच्या मदतीला

इगतपुरीनामा न्यूज, दि. 27कोरोनाचे वाढतच चाललेल्या संक्रमणामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थापन बिघडून गेलेले आहे. अस्वस्थ रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सातत्याने प्रयत्न करीत आहे. असे असले तरी बेड शिल्लक नसल्यामुळे आरोग्य यंत्रणा ह्या परिस्थितीपुढे हतबल ठरते. अशा बिकट अवस्थेत इगतपुरी तालुक्यातील नागरिकांना तातडीने बेड उपलब्ध व्हावे म्हणून दिल्लीच्या महिला आयएफएस अधिकारी अंकिता वाकेकर सरसावल्या आहेत. त्यांनी […]

घोटीच्या १३ कोरोना रुग्णांना “त्रिमूर्ती” मुळे जीवदान

इगतपुरीनामा न्यूज, दि. 27नाशिकसह राज्यभर जीवनदायी ऑक्सिजनची प्रचंड मागणी असूनही तेवढाच तुटवडा सुद्धा आहे. घोटी शहरातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. घोटी येथील साई कोविड हॉस्पिटलमध्ये 13 कोरोना बाधित ऑक्सिजनवर आहेत. त्यांच्यासाठी सोमवारी पूर्ण दिवसभर लागेल इतके ऑक्सिजन सिलेंडर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होते. मात्र त्यांनंतर काय ? असा प्रश्न हॉस्पिटलच्या संचालकांना पडला. लवकर ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी सर्वांनी […]

कमी वेळात कमी खर्चात भयमुक्त आणि कोरोनामुक्त व्हायचंय ?
मग नाशिकचे देवदूत डॉ. वडगावकर यांची ही माहिती वाचायलाच हवी

कोरोनाची दुसरी लाट संसर्गापेक्षा अभूतपूर्व भीती आणि गैरसमज यांच्या आधाराने लोकांचा बळी घेत आहे. कोरोना आजाराने मृत्यूचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं…असं मानणारे हजारो कोरोनाबधित रुग्ण नाशिकच्या डॉ. अतुल वडगावकर यांनी भयमुक्त करून कोरोनामुक्त केले आहेत. महामारी आल्यापासून आजपर्यंत एकही रुग्ण दगावला नसल्याने डॉ. वडगावकर यांना साक्षात देवदूत म्हटलं तरी अजिबात […]

गोरख बोडके ठरले तालुक्याचे “दातृत्ववीर” ; पदरमोड करून दिले १० “रेमडेसिवीर”

इगतपुरीनांमा न्यूज, दि. १९कोरोनामुळे अभूतपूर्व अशी भयानक परिस्थिती सर्वत्र उदभवली आहे. ऑक्सिजनची टंचाई, बेडचा सवाल, तुटपुंजी आरोग्य यंत्रणा अशा अनेकविध अडचणींवर मात करून कोरोना युद्ध सुरू आहे. अशा आणीबाणीच्या क्षणी अनेकांच्या खऱ्या दातृत्वाची कसोटी पाहायला मिळते. बऱ्याच जणांनी त्यांची चांगली परिस्थिती असतांनाही मदत करण्याच्या लढाईत किंचितही योगदान दिले तर नाहीच पण ते सध्या कुठं आहेत […]

error: Content is protected !!