मा. जि. प. सदस्य गोरख बोडके यांच्या आवाहनाला साद देऊन संवेदनशील मनाच्या आयएफएस अधिकारी अंकिता वाकेकर धावल्या इगतपुरीकरांच्या मदतीला

इगतपुरीनामा न्यूज, दि. 27
कोरोनाचे वाढतच चाललेल्या संक्रमणामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थापन बिघडून गेलेले आहे. अस्वस्थ रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सातत्याने प्रयत्न करीत आहे. असे असले तरी बेड शिल्लक नसल्यामुळे आरोग्य यंत्रणा ह्या परिस्थितीपुढे हतबल ठरते. अशा बिकट अवस्थेत इगतपुरी तालुक्यातील नागरिकांना तातडीने बेड उपलब्ध व्हावे म्हणून दिल्लीच्या महिला आयएफएस अधिकारी अंकिता वाकेकर सरसावल्या आहेत. त्यांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयासाठी 10 बेड आणि त्यासोबत अत्यावश्यक असणारे सर्व अत्याधुनिक साहित्य सामाजिक जाणिवेतून दिले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यांनी हे महत्वपूर्ण सत्कार्य केले आहे. इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात आता 10 अतिरिक्त सुसज्ज बेड उपलब्ध झाल्याने रुग्णांचा जीव वाचवता येईल असे वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे यांनी सांगितले.
इगतपुरी तालुक्यात दररोज नवीन कोरोना रुग्ण सापडत असून त्यामध्ये ऑक्सिजन कमी झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. सध्याच्या बिकट काळात संपूर्ण आरोग्य यंत्रणा मोठ्या तणावाखाली आहे. रुग्णाला ऑक्सिजन, बेड यांसह अत्यावश्यक असणाऱ्या सामुग्रीची प्रचंड टंचाई आहे. यामुळे अनेक गोरगरीब नागरिकांना उपचार करण्यासाठी प्रचंड स्वरूपाच्या अडचणी येत आहेत. त्यावर मात करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके हे नेहमीच आघाडीवर असतात. त्यांच्या प्रयत्नांनी आतापर्यंत ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन, रेमडीसीविर इंजेक्शन आदींची उपलब्धता झालेली आहे. मात्र इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात 10 वाढीव बेड आणि त्यासोबतचे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध झाले तर अजूनही अनेकांचा बहुमोल प्राण वाचवता येईल अशी माहिती गोरख बोडके यांनी दिल्लीमध्ये कार्यरत असणाऱ्या आयएफएस अधिकारी अंकिता वाकेकर यांना दिली. त्यांनी तातडीने इगतपुरी तालुक्यातील जनतेच्या मदतीला धावून 10 बेड, त्यासोबतचे अत्याधुनिक साहित्य यांसाठी तातडीने आर्थिक मदत केली. आगामी काळात काही अत्यावश्यक कारणासाठी मदत लागली तर हक्काने हाक मारा असा शब्दही अंकिता वाकेकर यांनी दिला.
आयएफएस अधिकारी अंकिता वाकेकर यांच्यावतीने मिळालेल्या सर्व साहित्याचे वितरण माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या हस्ते करण्यात आले. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे, सामाजिक कार्यकर्ते रोंग्यानाना शिरोळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसीम सय्यद, सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश पुरोहित आदींसह पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

संकटग्रस्त रुग्णाला संजीवनी मिळाली

■ अंकिता वाकेकर ह्या संवेदनशील मानवता जपणाऱ्या महिला आयएफएस अधिकाऱ्यांनी इगतपुरी तालुक्यासाठी 10 बेडसाठी केलेली मदत शेकडो रुग्णांचा प्राण वाचवणारी आहे. त्यांच्या मदतीबद्धल संपूर्ण इगतपुरी तालुका त्यांचा कायमस्वरूपी ऋणी राहील. आता बेडमुळे संकटग्रस्त असणारे रुग्णांवर आम्हाला उपचार करता येईल.
– डॉ. स्वरूपा देवरे, वैद्यकीय अधिक्षिका ग्रामीण रुग्णालय इगतपुरी

Similar Posts

3 Comments

  1. avatar
    सुधीर फडके says:

    अतिशय सकारात्मक बातम्या देत आहात तुमचे मनापासून अभिनंदन

Leave a Reply

error: Content is protected !!