शिक्षकांची आभाळ “माया” सेवानिवृत्त

लेखन : प्रमोद पांडुरंग परदेशी, राज्य आदर्श शिक्षक भगूर केंद्राच्या केंद्रप्रमुख आदरणीय सौ. माया शिंदे मॅडम आज सेवानिवृत्त झालेत. भगूर केंद्रातील शिक्षकांनी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत एक नयनरम्य सोहळा संपन्न केला. खरं तर निरोप नव्हताच हा…होता प्रेमाच्या नात्यातील आपुलकीचा सोहळा. केंद्रप्रमुख सौ. माया शिंदे मॅडम ह्या अधिकारी म्हणून कधीच वागल्या […]

गुरूजींच्या पतपेढ्यांमध्येही घुसले राजकारणासह आर्थिक राजकारण

लेखन – सिद्धार्थ सपकाळे वैभव गगे संतोष श्रीवंत प्रमोद परदेशी ज्ञानेश्वर बांगर गुरुजी आपल्या पगारातुन दरमहा पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे आपली वर्गणी जमा करत असतो. तर का? वेळेवर आर्थिक चणचण भासल्यास किंवा कुटुंबातील विविध प्रकारच्या कार्यासाठी ताबडतोब कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी दरमहा आपली वर्गणी नित्यनियमाने भरत असतो. नाशिक जिल्ह्यात १२ ते १५ प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्था कार्यरत आहेत. […]

लॉकडाऊनची वर्षपूर्ती : काय शिकवले लॉकडाऊनने ?

लेखन : प्रा. देविदास गिरी उपप्राचार्य के. पी. जी. महाविद्यालय, इगतपुरी कोविड महामारी आल्यामुळे जगाबरोबरच भारतातही लॉकडाउन करण्यात आले. या घटनेला वर्ष पूर्ण झालं आहे. याचे अनेक चांगले तसेच वाईट अनुभव आले. माणसाचे धावणे अचानक थांबले जगणे आणि मरणे याविषयी माणूस वेगळ्या पद्धतीने विचार करू लागला. या काळात खऱ्या अर्थाने माणूस अंतर्मुख झाला. गरीब जनतेचे […]

लॉकडाऊन वर्षपूर्तीच्या निमित्ताने..

लॉकडाऊन वर्षपूर्तीनिमित्त…. “पुन्हा असा अनुभव कुणालाही नको अशी ती भयावह परिस्थिती होती. आजार नवीन,व्हायरस नवीन,नेमकी काय ट्रीटमेंट ह्या आजाराला बरं करू शकेल ह्याचा पूर्ण जगाला काहीच थांगपत्ता लागत नव्हता.अशा परिस्थितीत डॉक्टर म्हणून आणि त्यातल्या त्यात होमिओपॅथी डॉक्टर म्हणून त्या काळात खूप कोविडच्या रुग्णांची होमिओपॅथी औषधांच्या माध्यमातून कोरोनाला प्रतिबंधात्मक व उपचार देखील करता आले. डॉक्टर असल्याचा […]

गरज ऑनलाइन शिक्षण साक्षरतेची!

महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत अनेक लहान मोठ्या शिक्षण संस्था शिक्षणशास्त्री सामाजिक राजकीय सुधारकी धुरिणांबरोबरच शासन, अधिकारी व जनतेचा मोठा सहभाग राहिला आहे. अगदी प्रौढ साक्षरता प्रसारासाठी अक्षरधारा व रात्रीचे प्रौढ शिक्षण वर्ग गावागावातून चालवले गेले. ही शैक्षणिक चळवळ सामुदायिकरित्या प्रशिक्षित वर्गाकडून चालवली गेली. व यातूनच महाराष्ट्र साक्षरतेचे उद्दिष्ट गाठू शकला. सन 2009 च्या आरटीई अधिनियमामुळे सक्तीच्या […]

चिमणी

काल झालेल्या जागतिक चिमणी दिनानिमित्त मीनाक्षी काटकर यांची कविता चिमणी चिव चिव चिमणीआली अंगणी।हळूच म्हणालीदेता का पाणी॥ चिव चिव चिमणीबसली झाडावर।म्हणते मला कशीदाणे द्या पसाभर॥ चिव चिव चिमणीउडत गेली शेजारी।काकूला मागू लागलीगोड गोड पूरी॥ चिव चिव चिमणीआली बघा शाळेला।वाचवा हो चिमणीसांगितले सगळ्याला॥ मीनाक्षी काटकर – सहा.शिक्षिकाजि.प.प्राथ.शाळा टाकळी, पं.स.दारव्हा जि.यवतमाळ

इगतपुरीनामा विशेष : लॉकडाऊनचा हॅप्पी बर्थ डे !

(टीम इगतपुरीनामा) उद्याची तारीख आहे 22 मार्च 2021! वर्षभरापूर्वी आजच्याच तारखेला ट्रायल लॉकडाऊन घेण्यात आले आणि त्यानंतर दीर्घकालीन लॉकडाऊन सुरू झाले ते आजतागायत थोड्याफार प्रमाणात का असेना पण सुरू आहेच! सुरुवातीला 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित झाले तेंव्हा बऱ्याच जणांना लॉकडाऊनचा इफेक्ट ध्यानात आलेला नव्हता. सवय नसल्याने 21 दिवस जड गेले खरे, पण फक्त 21 दिवसांचा […]

रविवार विशेष : दुसर्‍यांच्या यशोगाथांची पारायणे नका करू!

– पुरुषोत्तम आवारे पाटील परवा एक तरुण आला. आजवर म्हणे पन्नास लोकांच्या यशोगाथा वाचून झाल्या. अजूनही खूप वाचायच्या आहेत. गेल्या दीड वर्षापासून वाचतोय. प्रत्येकाच्या जीवनातून, त्याच्या संघर्षातून काहीतरी नवे शिकायला मिळत आहे. या दीड वर्षात स्वतःचा काहीतरी नवा धंदा सुरू करावा हे मात्र जमले नाही. या कोरोनाच्या काळात तर सगळे ठप्प झालेय. उत्पन्नाचा स्त्रोतच थांबलाय, […]

कवितांचा मळा : ” माणूस माणसासाठी परका झाला ” : कवी प्रकाश कवठेकर

दगा झाला, घात झालासैतानी कोरोना भारतात आलासगळीकडे एकच कोलाहल झालाहा गेला तो गेला!!.. देशात मग लॉकडाऊन झालाजनतेने त्याकडे कानाडोळा केला!सर्दी, ताप, अन खोकला आलासंशयाने डोक्यात कहरच केला!!.. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलामाणूस माणसासाठी परका झाला!नात्यातील माणसाशी दुरावा आलाशेवटी कोरोना योध्यानेच अंत्यसंस्कार केला!!.. बघता बघता रोजगारही गेलाअन्न पाण्याविना जीव कासावीस झाला!कोरोना आला कोरोना आला,माणूस माणसासाठी परका झाला!!.. […]

यशाच्या कल्पना व्यवहारवादी बनवा !

– पुरुषोत्तम आवारे पाटील ; संपादक, दै. अजिंक्य भारत, अकोलासंवाद –9892162248 आपल्या समाजात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होेणार्‍या व्यक्तींचा संबंध देव आणि दैवाशी जोडला जातो. व्यक्ती विविध क्षेत्रात यश का मिळवत जातात कारण नशिबाची त्यांना साथ असते म्हणून, नशिब, लक, प्रारब्ध आणि दैव ज्याला साथ देते त्याच्यात पदरात यश पडत असते असे पूर्वापार  मानले जाते. आपले […]

error: Content is protected !!