गुरूजींच्या पतपेढ्यांमध्येही घुसले राजकारणासह आर्थिक राजकारण

लेखन – सिद्धार्थ सपकाळे
वैभव गगे
संतोष श्रीवंत
प्रमोद परदेशी
ज्ञानेश्वर बांगर

गुरुजी आपल्या पगारातुन दरमहा पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे आपली वर्गणी जमा करत असतो. तर का? वेळेवर आर्थिक चणचण भासल्यास किंवा कुटुंबातील विविध प्रकारच्या कार्यासाठी ताबडतोब कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी दरमहा आपली वर्गणी नित्यनियमाने भरत असतो. नाशिक जिल्ह्यात १२ ते १५ प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्था कार्यरत आहेत. पतसंस्थांचा कार्यकाळ संपुष्टात आलेला आहे. परंतु, कोरोना या वैश्विक महामारीमुळे सदर पतसंस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. यातच सहकार विभागाकडुन ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेवु शकतात असा आदेश काढला आहे… मात्र ऑनलाईन सभेच्या नावाखाली संचालक मंडळांनी राजकारण पुढे आणत शिक्षक हिताच्या नसलेल्या अनेक विषयांना सभासदांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावत आर्थिक खर्चांना आणि भविष्यातील आपले संचालक पद कसे टिकेल यावरच भर देत विषयांना मंजुर करून घेण्याचा घाट घातला जातोय. त्यासाठी आता ना खाणार ना खाऊ देणार या तत्वावर शिक्षकांची नविन फळी निर्माण झाली असुन विद्यमान संचालकांसाठी पुढील निवडणुकीत निवडुन येण्यासाठी मात्र धोक्याची घंटा समजली जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!