काल झालेल्या जागतिक चिमणी दिनानिमित्त मीनाक्षी काटकर यांची कविता
चिमणी
चिव चिव चिमणी
आली अंगणी।
हळूच म्हणाली
देता का पाणी॥
चिव चिव चिमणी
बसली झाडावर।
म्हणते मला कशी
दाणे द्या पसाभर॥
चिव चिव चिमणी
उडत गेली शेजारी।
काकूला मागू लागली
गोड गोड पूरी॥
चिव चिव चिमणी
आली बघा शाळेला।
वाचवा हो चिमणी
सांगितले सगळ्याला॥
मीनाक्षी काटकर – सहा.शिक्षिका
जि.प.प्राथ.शाळा टाकळी, पं.स.दारव्हा जि.यवतमाळ