इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकपासून वाडीवऱ्हे गोंदे पर्यंत वाहतुक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. १५ मिनिटांच्या प्रवासासाठी दोन ते चार तास लागत आहेत. लहान मोठी वाहने, मोटारसायकली चांगलीच अडकून बसत असल्याने वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे. महामार्गावर काम करणाऱ्या ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापन केलेले नसल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे. याच कारणांनी अपघातही […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे सांजेगाव रस्त्यावर आज दुपारी अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने अपघात झाला. आज दुपारी १ वाजेच्या सुमाराला झालेल्या ह्या घटनेत १ जण ठार तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक मुंबई महामार्गावर व्हीटीसी फाट्यावर आज सकाळी एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाला. ह्या अपघातात आठ ते दहा जण जखमी झाले आहेत. ही बस नाशिकहून कसारा येथे जात होती. बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. ह्या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी तर बसमधील चालक वाहकासह आठ ते दहा प्रवासी जखमी […]
इगतपुरीनामा न्यूज – नासिक मुंबई महामार्ग ह्या प्रमुख रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. खड्डेच खड्डे पडले असल्याने ह्या रस्ता कसा म्हणावा असा प्रश्न पडतो आहे. कुठे खड्डे चुकविताना तर कुठे खड्यांमधून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या दोन वाहनांचा अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवायच्या प्रयत्नात भगतवाडी गावाजवळ हा अपघात झाला आहे. वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही वाहने रस्त्यालगत असणाऱ्या छोट्या पुलावरून खाली कोसळले. ह्या वाहनांमधील ४ जण जखमी झाले असून त्यांची नावे अद्याप कळाली नाहीत. इगतपुरी पोलिसांना याबाबत माहिती […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील टांगा शर्यतीत बाजूला उभे राहून शर्यत पाहणाऱ्या शौकीन व्यक्तीचा टांगा अंगावर आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पोपट कचरु मुंजे वय ५२ वर्षे रा. सारुळ, ता. जि. नाशिक असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सारूळ परिसरात सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर होते. आज सायंकाळी ५ वाजता मुंढेगाव येथील प्रसिद्ध टांगा […]
इगतपुरीनामा न्यूज – अपघात झाला नाही असा एकही दिवस सध्या मुंबई आग्रा महामार्गावर जात नाहीये. वाहनांचे आपल्या वेगावर नियंत्रण नसून बेफाम वाहने वाढली आहेत. येथून प्रवास करणारा व्यक्ती सुखरूप राहावा अशी प्रार्थना त्याचे कुटुंबीय करीत असतात. आज सकाळी दहाच्या सुमारा एक चारचाकी वाहन मुंढेगावजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या समोर अचानक बंद पडले. यामध्ये एकाच कुटुंबातील ४ […]
इगतपुरीनामा न्यूज – बेदरकार वेगाने चालणारी वाहने, वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली आणि पोलिसांकडून वचक ठेवला जात नसल्यामुळे मुंबई आग्रा महामार्गावर छोटे मोठे अपघात वाढले आहेत. आज सकाळी पाडळीजवळ नासिककडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारल्याने मोटारसायकलचा अपघात झाला. हा अपघात करून अज्ञात वाहन पसार झाले. या अपघातात चेतन भगवान चव्हाण वय 18, कार्तिक राजू चव्हाण […]
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर नासिक कडून मुंबईकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने गॅस कंपनी समोर जिंदाल कंपनी जवळ २ कामगारांना धडक दिली. अपघातानंतर अज्ञात वाहन वेगाने पसार झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेने समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच पंकज तिवारी वय ३० हा कामगार मयत असल्याचे […]
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर गोंदे दुमाला प्रभू ढाब्याजवळ आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भरधाव वाहनाचे टायर फुटून अपघात झाला. या घटनेत ४ जण जखमी झाले आहेत. मुंबईकडून नाशिकच्या दिशेने येत असताना वाहन क्रमांक MH 15 DS 1956 ह्याला अपघात होऊन वाहनाने पलटी मारली. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेने समयसुचकतेने अपघातस्थळी […]