आहुर्लीजवळ अपघात ; नाशिकचे ८ युवक गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील आहुर्ली जवळ MH 41 AS 6521 ह्या कार चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त कार शेतात घुसून चार पलट्या मारल्या. ह्या अपघातात एक जण गंभीर तर ६ ते ७ जण जखमी झाले आहेत. गस्तीवर असलेल्या महामार्ग पोलीस केंद्र घोटीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना मदतकार्य करून बाहेर काढले. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक निवृत्ती गुंड यांनी पुढील उपचारासाठी जखमी व्यक्तींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. निर्मल अनिल थोरात वय १८, यश संतोष आढाव वय १८, ओम भानुदास चोपडा वय २१, प्रथमेश ढाके, यश पालवे, मेहुल चावरिया, रितेश कदम, वेदांत मुळे सर्व राहणार बळी मंदिर, नाशिक अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत.

error: Content is protected !!