कसारा घाटातील अपघातामुळे नाशिककडे येणारी वाहतूक ठप्प 

इगतपुरीनामा न्यूज – कसारा घाटात कंटेनरचा अपघात झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली आहे. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. याबाबत उपलब्ध झालेली अधिक माहिती अशी की मुंबईहून नाशिककडे येणारा कंटेनर हा सकाळी कसारा घाटामध्ये आला असता अचानक बंद पडला. या ठिकाणी उभ्या असलेल्या कंटेनरवर पाठीमागून येणारा कंटेनर आदळल्यामुळे अपघात झाला. त्यामुळे संपूर्ण कसारा घाट ठप्प झाला. नासिककडे येणारी वाहतूक ही बंद झाली आहे. त्यामुळे इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेड, महामार्ग सुरक्षा विभाग व इतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी म्हणून जुन्या कसारा घाटातील वाहतूक वळविण्यात आली असून आता ही वाहतूक नवीन कसारा घाटातून नाशिककडे वळविण्यात आली आहे. या अपघातामुळे नासिक मुंबई महामार्गावरील वाहतूक ही धिम्म्या गतीने सुरू आहे. व्हिडिओ बातमी पहा https://youtube.com/shorts/y_lugbZcNUM?si=LHIDW0q8XXO3-Zd0

error: Content is protected !!