बालसंस्कार शिबिरातून संस्कार आणि आत्मबळाची प्राप्ती – हभप बाळासाहेब महाराज गतीर : बेलगाव कुऱ्हे येथे छत्रपती शिवाजी महाराज बालसंस्कार शिबिराचा समारोप

इगतपुरीनामा न्यूज – परमेश्वर, गुरूंवर विश्वास ठेवल्यास विद्या, अखंड ज्ञान प्राप्त होते. यासाठी कठोर मेहनत आवश्यक आहे.आजचा बालक उद्याचा पालक असून शिबिराच्या माध्यमातून संस्काराची शिदोरी मिळत असते. बालसंस्कार शिबिरातुन आत्म विद्या प्राप्त होते. यातूनच नवी पिढी वारकरी संप्रदाय घडवतील असे प्रतिपादन हभप बाळासाहेब महाराज गतीर यांनी बेलगाव कुऱ्हे येथे छत्रपती शिवाजी महाराज बालसंस्कार शिबिराचा समारोप […]

प्रभूनयन फाउंडेशन व श्री साई सहाय्य समितीतर्फे वारकरी साहित्याचे वाटप

इगतपुरीनामा न्यूज – दिव्यांग असूनही पंढरीनाथ महाराज सहाणे यांनी केलेल्या वारकरी सांप्रदायिक कार्याची दखल घेऊन अंधेरी येथील प्रभूनयन फाउंडेशन व श्री साई सहाय्य समिती इगतपुरी यांनी घेतली आहे. संस्थापकीय अध्यक्ष आनंद मवाणी, श्री साई सहाय्य समितीचे राजू देवळेकर यांच्या मार्गदशनाखाली त्यांना हार्मोनियम व तबला भेट देण्यात आला. पत्रकार लक्ष्मण सोनवणे, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना […]

‘स्वराज्य’च्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी सदैव तत्पर – युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे : शिरेवाडी येथील बालसंस्कार शिबिरात स्वराज्य संघटनेकडून गोड भोजनाचा आस्वाद

इगतपुरीनामा न्यूज -आध्यात्मिक बालसंस्कार शिबिरातून मुलांना संस्काराचे ज्ञानदान मिळते. उन्हाळी सुट्टीत बालकांचा वेळ पारमार्थिक कार्यात सत्कारणी लागत असल्याने भावी पिढीला वारकरी संप्रदायाचा वारसा जपता येईल. स्वराज्यप्रमुख संभाजी राजे छत्रपती, स्वराज्यचे प्रवक्ते करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन स्वराज्यचे युवा तालुकाध्यक्ष तथा शिव भोले हॉटेलचे संचालक गोकुळ धोंगडे यांनी […]

बोर्ली, वाघ्याचीवाडी, धामडकीवाडी आणि इगतपुरी तालुक्यातील आदिवासी गावांत आखाजा साजरी : आदिवासी संस्कृतीत ह्या सणाची “अशी” आहे परंपरा

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील विविध आदिवासी वाड्यापाड्यांमध्ये मोठ्या धूमधडाक्यात अक्षयतृतीया सण साजरा झाला. महिला, युवती, बालिका आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा केल्या. आदिवासी संस्कृतीच्या रीतीरिवाजाप्रमाणे हा सण संपन्न झाला. धामडकीवाडी येथे आखजा सण सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. बोर्ली वाघ्याचीवाडी येथेही ग्रामस्थांनी आखजा सणाचा आनंद लुटला. बोर्लीचे उपसरपंच गोविंद भले आणि […]

परमेश्वराकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कीर्तन प्रवचन – हभप प. पु. महंत अचलपूरकर

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – परमेश्वराकडे  जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कीर्तन प्रवचन असुन यामुळे मोक्षाची प्राप्ती होते.  सकलांचा उद्धार झाला पाहिजे. कीर्तन म्हणजे मंथन आहे.  अनंत जीवनात जीवाला फेरे पडले. कीर्तनात खूप मोठी ताकद लपली आहे. पारमार्थिक कार्य करणारा माणूस जगाला आवडत नाही फक्त भगवंताला आवडतो. प्रत्येकाने अहंकार बाजूला केल्यास परमेश्वराची नक्कीच प्राप्ती होईल असे […]

भक्तांसाठी देव परमात्मा आपले सर्वस्व देऊ शकतो : हभप अमोल महाराज बडाख : जानोरी येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरु

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ – नवसमाज निर्मिती, आदर्श नागरिक बनण्यासाठी देव, धर्म, राष्ट्र यांच्यासह प्रवचन, कीर्तनातून जागर करणाऱ्या वारकरी संप्रदायाची गरज आहे. हिऱ्याची व काचेची बरोबरी होत नाही. त्याचप्रमाणे पाप पुण्याची कधीही बरोबरी होत नाही. भगवंताचे नामसमरण केल्याने पापाचा नाश होऊन उद्धार होतो. भक्तांसाठी देव परमात्मा आपले सर्वस्व देऊ शकतो असे निरुपण कीर्तनरत्न हभप अमोल […]

वारकऱ्यांचे लाडके वै. शत्रुघ्न महाराज गतीर – इगतपुरी तालुक्यातील अनमोल रत्न पांडुरंगचरणी विलीन

लेखन – भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा पवित्र ते कुळ पावन तो देशजेथे हरिचे दास जन्म घेतीअसे सर्वच संतांचे सिद्ध झालेले प्रमाण आहे. ह्यानुसार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका सुद्धा मागे नाही. ह्या तालुक्यात विविध रत्नांची खाण आहे. ह्यापैकी अत्यंत महत्वाचे अनमोल असणारे एक रत्न हभप शत्रुघ्न महाराज महादु गतीर हे १ एप्रिल २०२३ ला वैकुंठवासी झाले. […]

भवानी माता यात्रोत्सवानिमित्त चित्ताकर्षक शोभायात्रेने वेधले भाविकांचे लक्ष : गोंदे दुमाला ग्रामस्थांच्या एकजुटीचा लोकोत्सव कौतुकास्पद

इगतपुरीनामा न्यूज, दि ६ – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला  ग्रामदेवता भवानी माता जंगी यात्रोत्सवानिमित्त आज सकाळपासून भवानी मातेच्या पूजेसाठी आणि दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली. विविध वस्तूंच्या दुकानामध्ये खरेदी झाली. गोंदे दुमाला येथील सर्व ग्रामस्थ पारंपरिक फेटे बांधून प्रचंड उत्साहात सहभागी झाले. संपूर्ण गावातून भवानी मंदिरापर्यंत काढण्यात येणाऱ्या भव्य शोभायात्रेत ग्रामस्थांच्या एकोप्याचे दर्शन झाले. […]

गोंदे दुमाला येथे ग्रामदेवता भवानी मातेचा उद्या जंगी यात्रोत्सव : विविध आकर्षक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे ग्रामस्थांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील जागृत ग्रामदेवता भवानी माता जंगी यात्रोत्सवाचे उद्या गुरुवारी हनुमान जयंती निमित्ताने ६ एप्रिलला आयोजन करण्यात आले आहे. विविध कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत गोंदे दुमाला आणि ग्रामस्थांनी केले आहे. उद्या दुपारी ३ ते ४ पर्यंत उपस्थित मान्यवरांना फेटे बांधणे, मारुतीराया आणि रथ पूजन, […]

रामनवमीनिमित्ताने इगतपुरी शहरात चिमुकल्यांनी वेशभूषा करून काढली शोभायात्रा : जय श्रीरामच्या जयघोषाने इगतपुरी झाली चैतन्यमय

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – इगतपुरी येथील नूतन मराठी शाळेत रामनवमी निमित्त सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण कार्यक्रमाचचे आयोजन करण्यात आले. ह्या कार्यक्रमात अंगणवाडी ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राम, सिता, लक्ष्मण, हनुमान यांची वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदवला. यावेळी सामूहिक सुरया रामरक्षा स्तोत्र पठण करण्यात आले. या चिमुकल्यांनी शहरातून जय श्रीरामच्या घोषणा देत प्रभू श्रीरामाची शहरातून […]

error: Content is protected !!