श्री गजानन मित्र मंडळाने साकारलेला श्री केदारनाथ देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

इगतपुरीनामा न्यूज – घोटी शहरात नवरात्रौत्सवानिमित्त श्री गजानन मित्र मंडळाने प्रति श्री केदारनाथ मंदिराचा भव्य देखावा साकारला आहे. ही कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी होत असून देखावा पाहण्यासाठी भाविक येत आहेत. दरवर्षी श्री गजानन मंडळाकडुन वेगवेगळे धार्मिक देखावा साकारण्याची परंपरा आहे. घोटीच्या उपसरपंच स्वाती कडु, श्री गजानन मित्र मंडळाचे मार्गदर्शक हिरामण कडु, भाऊसाहेब शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा होत आहे. या ठिकाणी रोज रात्री गरबा दांडिया खेळण्यासाठी घोटीतील महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मंडळाचे अध्यक्ष कल्पेश भगत, उपाध्यक्ष नितिन कडु, भरत नवले, गणेश दुभाषे, योगेश शेलार, अक्षय कडु, रमेश छत्रे, राजु भटाटे, माधव नवले, लहु भगत, सोमनाथ कडवे, गौरव कडवे, अर्जुन भागडे, सतिष कडु, जगदिश जोशी, शंकर कडु, भोलेनाथ भोर, निलेश शेलार, रघुनाथ कडु, सुनिल भोर, आकाश कडु, शिवाजी नवले, प्रविण चव्हाण, गणेश कडु, पांडुरंग डाके, विलास भगत, पांडुरंग भोर, रतन कडु, शिवाजी भगत, छोटु कडु, कैलास कडु, गणेश भगत, विनोद कडु, चंद्रकांत म्हसणे, राजु कडु, गोरख भगत, सागर कडु आदी दरवर्षी सदस्य परिश्रम घेतात.

Similar Posts

error: Content is protected !!