टाळ-मृदुंगाच्या गजरात इगतपुरी तालुक्यात गणरायाला निरोप : ग्रामप्रदक्षिणेत वारकरी भजने व पावल्यानी वेधले लक्ष

निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील विविध भागात गणरायाला भावपूर्ण निरोप देऊन विसर्जन करण्यात आले. सकाळपासून विविध मंडळांनी नियोजित वेळेत जवळ असणाऱ्या नदी, धरणे ह्या ठिकाणी बाप्पाला विसर्जित केले. तालुक्यातील पिंपळगाव मोर येथे गेल्या दहा दिवसापासून विराजमान झालेल्या बाप्पाला आज साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. विसर्जन शांततेत झाले असून कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही. सालाबाद प्रमाणे बाप्पा विराजमान झाल्याने गणेशोत्सव काळात अत्यंत आनंद आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. लहान मुलांना तर पर्वणीच असते. पिंपळगाव मोरचे वैशिष्ठ्य म्हणजे टाळ मृदुंगाच्या तालात पारंपरिक पद्धतीने बाप्पाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ग्रामप्रदक्षिणा झाल्यानंतर दारणा नदीकाठी आरती व त्यांनतर विसर्जन करून प्रसाद वाटप करण्यात आला. गावातील भजनी मंडळी गणेशोत्सव काळात दहाही दिवस प्रत्येक घरगुती व मंडळाच्या गणपती समोर वारकरी भजन करून हरिनामाचा जागर करतात. प्रत्येक गणपतीसमोर भजन ठरलेले असते. मध्यरात्रीपर्यंत रोज भजनाचे कार्यक्रम होतात. भजनी मंडळींमध्ये शांताराम काळे, जगन्नाथ काळे, सुरेश काळे, हौशीराम काळे, नामदेव काळे, बाळू माळी, दशरथ काळे, सदाशिव काळे, भगवंता सोनवणे, रामदास काळे, संजय कदम, देविदास कुंदे, मधुकर बेंडकोळी, ज्ञानेश्वर डगळे, नितीन कदम, योगेश काळे, वाळू कदम आदींसह तरुण पिढीने देखील सहभाग नोंदवला.

Similar Posts

error: Content is protected !!