

इगतपुरीनामा न्यूज – ‘श्री स्वामी समर्थ क्रिएशन’ प्रस्तुत ‘मोरया’ या नव्या कोऱ्या भक्तिगीताने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. एका गणेशभक्ताने आर्त भावनेने गणरायाला वंदन करत घातलेली साद या ‘मोरया’ गाण्यातून स्पष्ट कळतेय. गणरायाचं आगमन झाल्यावर त्यांचा आनंद त्या गणेशभक्तांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय. यंदाच्या गणेशचतुर्थीला ‘मोरया’ हे मराठमोळं भक्तीगीत प्रत्येक गणेशप्रेमींच्या हृदयाचा ठोका चुकवायला सज्ज झालं आहे. ढोल, ताशांचा गजरात चित्रित झालेल हे गाणं प्रत्येक भक्ताच्या मनाचा ठाव घेईल यांत शंकाच नाही. ‘अभिनेता डॉ. गौरव भोसले पाटील व अभिनेत्री डॉ. गायत्री भालेकर यांनी या गाण्यात मुख्य भूमिका पाहायला मिळाली. या गाण्याच्या निर्मितीची धुरा निर्माते विजुतात्या विष्णुपंत बहिरट व प्रमोद अरविंद नाईक यांनी सांभाळली आहे. तर दिग्दर्शक डॉ. कुणाल नंदकिशोर मेथा यांनी दिग्दर्शित केलं आहे. संगीत प्रसाद प्रभाकर शिंदे यांचे तर गायक नकाश अझीझ याने त्याच्या दमदार व सुमधुर आवाजात हे गाणं गायले आहे. हे गाणे ह्या लिंकवर क्लिक केल्यावर ऐकता येईल.