किरण रायकर : इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
इगतपुरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कावनई विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शरद पांडुरंग शिरसाठ तर व्हॉइस चेअरमन म्हणून जगन जयराम पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सोसायटीमध्ये एकूण 13 संचालक असून शेतकरी विकास पॅनल विजयी झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शशांक पगार यांनी काम पाहिले. कावनई विविध कार्यकारी सेवा सोसायटी इगतपुरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण सोसायटी असून नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी या सेवा सोसायटीच्या माध्यमातून काम केले जाते.
नवनिर्वाचित चेअरमन शरद शिरसाठ, वपीस चेअरमन जगन पाटील हे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा बँकेचे संचालक व कॉग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, संपत काळे, कचरू शिंदे, गणपत राव, कुकडे मामा, पांडुरंग शिंदे, शिवाजी शिरसाठ यांचे विश्वासू सहकारी आहेत. यावेळी कावनईचे जेष्ठ नेते रामभाऊ शिरसाठ, खंडेराव शिरसाठ, शिवराम शिरसाठ, दिनकर पाटील, हरिभाऊ पाडेकर, पप्पू पाडेकर, प्रकाश शिरसाठ, शेख, रमेश शिरसाठ, संदीप दोंदे, विकास शिरसाठ, रवी पाडेकर, उत्तम येडे, रामभाऊ रायकर, नंदू पाटील, गजीराम शिरसाठ आदी उपस्थित होते.