मुंढेगाव ते कानडवाडी रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात ; अस्वलीजवळच्या अपूर्ण पुलामुळे नागरिक त्रस्त : मनसे पदाधिकारी आक्रमक आंदोलनाच्या पावित्र्यात

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव ते कानडवाडी हा रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत आहे. ह्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनेकदा निवेदन देऊनही दखल घेतली गेलेली नाही. तक्रारी केल्यानंतर नांदगाव ते कानडवाडी फाटा, कानडवाडी ते नांदूरवैद्य ह्या रस्त्यांचे काम झाले मात्र कानडवाडी ते मुंढेगाव हा रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात आहे. यामुळे अनेक गावाला जाणाऱ्या या रस्त्यामुळे यामार्गाहुन जाणारी बस सेवा बंद आहे. ह्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली असून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

नांदगाव बुद्रुक येथे मनसे पदाधिकाऱ्यांची विविध विषयांवर बैठक संपन्न झाली. मनविसे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते यांनी पदाधिकाऱ्यांना सुचना करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आंदोलन करणार असल्याचे सांगितले. जानोरी अस्वली या रस्त्यावर ओंडओहळ असून येथे सुरू असलेल्या पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. अपुर्ण कामामुळे लोकांना प्रचंड त्रास होतं असल्याने संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी. दुग्ध व्यावसायिक, कामगार, विद्यार्थी, शेतकरी या सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे. अर्धा किमी अंतरासाठी मुंढेगाव ते गोंदे मार्गे 14 किमी वळसा घालून अस्वलीमध्ये यावे लागत आहे. यावेळी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे, बाजीराव गायकर, विजय गायकर, रंगनाथ खातळे, समाधान गायकर, योगेश गायकर, दिपक गायकर, संदीप यंदे, आनंदा कर्पे, काका कर्पे, सुभाष मुसळे, शरद मुसळे, वैभव दातीर, किरण बोंबले, किरण तांबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!