कॅबिनेट मंत्री ना. छगन भुजबळ यांचे इगतपुरीत अभूतपूर्व स्वागत : ना. भुजबळ यांची इगतपुरी तालुक्यावर भक्कम पकड असल्याचे सिद्ध

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. छगन भुजबळ यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. इगतपुरी येथील हॉटेल ग्रीन लँड येथे हजारो कार्यकर्त्यांनी फटाके आणि आतिषबाजी करीत भर पावसाठी जोरदार स्वागत केले आहे. भाजप व शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मंत्री ना. छगन भुजबळ  नाशिककडे जातांना इगतपुरीला थांबले होते. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सदस्य गोरख बोडके, माजी आमदार शिवराम झोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांकडून झालेले स्वागत पाहता श्री. भुजबळ यांची इगतपुरी तालुक्यावर चांगलीच पकड असल्याचे सिद्ध झाले आहे. भुजबळ साहेब आगे बढो सारख्या घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री ना. छगन भुजबळ यांचे स्वागत केले आहे. याप्रसंगी घोटी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाने, संचालक सुनील जाधव, राष्ट्रवादीचे नेते फिरोज पठाण, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवा काळे, युवा उपजिल्हाध्यक्ष अनिल पढेर, कार्याध्यक्ष मदन कडू, पीके ग्रुपचे प्रशांत कडू, सिद्धार्थ भामरे, बाळासाहेब झोले, माजी सरपंच कैलास भगत, खादी ग्रामोद्योग संघाचे व्हॉइस चेअरमन अनिल भोपे, संचालक भगीरथ भगत, महिला युवती अध्यक्ष रुख्मिमी जोशी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हॉइस चेअरमन, संचालक यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!