
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरु आहे. २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे आदेशही लागू करण्यात आले आहे. त्यानुसार इगतपुरी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. मोबाईलमध्ये व्हॉट्स अप, फेसबुक, इन्स्ट्राग्राम, ट्विटर व इतर सोशल मिडीयाद्वारे मार्फतीने इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीतील कोणतेही उमेदवार, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या विरुध्द कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट, फोटो, वादग्रस्त विधाने व्यक्त करू नये. कोणत्याही धार्मिक, जातीय आक्षेपार्ह पोस्ट फोटो, व्हिडीओ शेअर करू नये. सर्व सोशल मिडीयावर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. आदर्श आचार संहितेचे तंतोतंत पालन करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणीही चुकीची, आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.