शिरसाठे सोसायटीच्या चेअरमनपदी रामदास सोपनर, व्हॉइस चेअरमनपदी किसन तेलंग यांची निवड : गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली झाली पदाधिकारी निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

शिरसाठे विविध कार्यकारी आदिवासी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामदास सोपनर यांची निवड झाली आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली ह्या सोसायटीमध्ये 13 जणांचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आलेले आहे. गोरख बोडके यांच्या नियोजनानुसार आज पदाधिकारी निवडणुक झाली. यावेळी झालेल्या बैठकीत व्हॉइस चेअरमनपदावर किसन तेलंग यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकारी शेतकऱ्यांसाठी चांगले काम करतील, त्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत कायम असल्याचा शब्द जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी दिला.

जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्यासह माजी आमदार शिवराम झोले, मनसेचे जिल्हा नेते ॲड. रतनकुमार इचम, बाजार समिती संचालक सुनील जाधव यांनीही उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. निवडीच्या बैठकीवेळी नवनिर्वाचित संचालक रामदास सदगीर, काशिनाथ सोपनर, कोंडाजी सदगीर, नामदेव आहेर, दत्तू चोथे, किसनाबाई सोपनर, रामभाऊ सोपनर, रोहिदास गांगुर्डे, दत्तू सदगीर, काळूबाई सोपनर हे उपस्थित होते. इगतपुरी तालुक्याच्या विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!