कृषी संजीवनी सप्ताह – बलायदुरी येथे शेतकरी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त आज इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी इगतपुरीचे मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे, सरपंच हिरामण दुभाषे, माजी सरपंच मल्हारी गटखळ, कृषी सहाय्यक दीपक भालेराव, रावसाहेब जोशी उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे यांनी खत व्यवस्थापन, युरिया ब्रिकेट वापर, संतुलित खतांचा वापर, भात पिकाचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि मिश्र खते कसे बनवावी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी भगीरथ भगत यांनी कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत कृषी पूरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. शेतीपूरक व्यवसाय सुरू केलेले शेतकरी कैलास भगत यांच्या शेतात बंदिस्त खेकडा पालन प्रकल्पाची सर्वांनी जाऊन पाहणी केली.

यावेळी बलायदुरी येथील काळू गटखळ, मणीलाल वाळू भगत, गोरख वाळू भगत, कांतीलाल त्र्यंबक दालभगत, भीमराव तुळशीराम चव्हाण, ज्ञानेश्वर गणपत राक्षे, भाऊ भोरू दुभाषे, शिवाजी अनाजी भगत, लहू लक्ष्मण नाठे, द्वारका चहादू राक्षे, राजाराम भोरू गटखळ, हिरामण साळवे, काळू तात्याबा भगत, दौलत दूंदा गटखळ, दशरथ पांडू गटखळ, देवराम नारायण भगत,भाऊ गोपाळ भगत, अशोक मंगळू भगत, उंबर धोंडू भगत, वजीर अहीलाजी गटखळ आदी शेतकरी हजर होते. कार्यक्रमात विविध विषयांवर मार्गदर्शन मिळाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!