वाडीवऱ्हे जवळ अपघातात २ युवक गंभीर जखमी ; नरेन्द्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेने वाचवले प्राण

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

मुंबई आग्रा महामार्गावरील निर्मळ आश्रमाजवळ झालेल्या अपघातात दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. नरेन्द्राचार्य संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना अपघाताची माहिती गोरख बोडके यांनी दिली. तातडीने घटनास्थळी पोहोचत त्यांनी गंभीर जखमी युवकांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचा जीव बचावला.

अधिक माहिती अशी की, मुंबई आग्रा महामार्गावर निर्मळ आश्रमजवळ मुंबईकडून नाशिककडे जाणारी वॅगनर क्रमांक MH 46 BY 6283 हिने भरधाव वेगात डिव्हाईडरवर दोन तीन पलट्या घेतल्या. हा अपघात दुपारी साडेचारच्या सुमारास झाला. ह्यामुळे झालेल्या अपघातात कारमधील विजय सुरेश चव्हाण वय २२, देविदास संभाजी चव्हाण वय २७ दोघेही राहणार खालापूर खोपोली हे गंभीर जखमी झाले. घटना घडताच गोरख बोडके यांनी याची माहिती नरेंद्रचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना कळवली. त्यानुसार त्यांनी तातडीने धाव घेऊन गंभीर जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. यामुळे युवकांचा प्राण वाचला. अपघाताची नोंद वाडीवऱ्हे पोलिसांनी घेतली असून तपास सुरू करण्यात आला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!