वाळविहीर सोसायटी : मनसेचे जिल्हा नेते ॲड. इचम यांच्या खंबीर नेतृत्वाखाली चेअरमनपदी प्रकाश लचके, व्हॉइस चेअरमनपदी प्रभाकर इचम यांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा नेते ॲड. रतनकुमार इचम यांच्या खंबीर नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या वाळविहीर विविध कार्यकारी आदिवासी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रकाश लचके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यासह व्हॉइस चेअरमनपदावर प्रभाकर इचम यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. १२ संचालक मंडळाच्या उपस्थितीत आज निवडप्रक्रिया राबवण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना इगतपुरी तालुक्यातून शुभेच्छा सुरु झाल्या आहेत.

वाळविहीर विविध कार्यकारी आदिवासी सहकारी सोसायटीच्या पदाधिकारी निवडीप्रसंगी इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, बाजार समिती संचालक सुनील जाधव, ॲड. भरत कोकणे उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा नेते ॲड. रतनकुमार इचम यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हितासाठी झपाटून काम करू असे नवीन पदाधिकाऱ्यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!