इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
कुशेगाव विविध कार्यकारी आदिवासी सहकारी सोसायटीच्या चेअरमन नवसु सखाराम खडके यांची बिनविरोध निवड झाली आहे. व्हॉइस चेअरमन म्हणून चंद्रकांत रघुनाथ सोनवणे यांना बिनविरोध संधी देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कुशेगाव सोसायटी पदाधिकाऱ्यांची निवडप्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध झाली. गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ निवडणुक सुद्धा अविरोध करण्यात आलेली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून योगेश गोराणे यांनी काम पाहिले.
याप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, कुशेगांव सोसायटीचे संचालक हरी काशिराम सराई, येसु सकु सराई, येसु नवसु सराई, नवसु खडके, पांडु सखाराम सराई, सक्रु दमा भस्मे, देवराम अंबु म्हसणे, अहिलाजी चिमाजी सोनवणे, मथुराबाई रावजी सराई यांच्यासह विविध ग्रामस्थ उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचे इगतपुरी तालुक्याच्या विविध पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.