आईच्या पुण्यतिथी निमित्त किशोर माने यांनी केली १५०० वृक्षांची लागवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे संचालक किशोर माने यांनी आईच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त यांच्याकडून १ हजार ५०० झाडांचे वृक्षारोपण केले. मरणानंतर होणारे श्राद्ध करतांना अनेकजण गोडधोड खाऊ घालतात. मात्र किशोर माने यांनी  जिवंतपणी आईची सेवा ते केलीच पण आई अनंतात विलीन झाल्यानंतर सुद्धा त्यांची सेवा सुरूच आहे. कोरोना काळामध्ये त्यांनी अनेक उपक्रम राबवले. गरिबांना अन्न धान्यापासून तर गरजूंसाठी बेड सुद्धा मिळवून दिले.

आईच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आईने जशी मायेची छाया दिली तशी छाया सर्वांना मिळावी यासाठी त्यांनी एक उपक्रम हाती घेतला. त्यातून त्यांनी १५०० वृक्षांची लागवड केली. या झाडांमध्ये वड, पिंपळ, पेरू, आंबा, जांभूळ, चिंच, आवळा, फणस अशी पर्यावरणाला ऑक्‍सिजन देतील अशा झाडांचा जास्त समावेश आहे.
18 जून ते 20 जून पर्यंत या झाडांचे वृक्षारोपण होणार आहे. दरीआई माता मंदिर परिसरात 500 झाडे, नासिक सायकलिस्ट फाउंडेशन, वृक्षवल्ली फाउंडेशनच्या माध्यमातून 3 दिवस हा उपक्रम राबवला जाईल. 19, 20 तारखेला चामर लेणी येथे 1000 झाडे लावणार आहेत. सर्व झाडे तब्बल तीन ते चार वर्षाची सहा फुटाच्या वरील उंचीची झाडे आहेत. ह्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!