कसारा घाटातील अपघातात मोटारसायकलस्वार ठार

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

मुंबई नाशिक महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जुना कसारा घाट चढून येत असताना वळणावर मोटरसायकलचा ताबा सुटल्याने मोटातसायकलस्वार ठार झाला. MH 04 KM 4864 ह्या मोटरसायकलस्वाराचा मोटरसायकल वरील ताबा सुटल्याने मोटरसायकल स्लीप झाली. त्यामुळे कंटेनर क्रमांक MH 46 AF 2269 ला मागून जाऊन धडकुन मागील चाकात अडकल्याने मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे, महामार्ग पोलिस व रूट पेट्रोलिंग टीमने तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृत व्यक्तीचे शव रुग्णवाहिकेद्वारे इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!