भाजपाचे भाऊसाहेब धोंगडे यांचा वाढदिवसानिमित्त कुऱ्हेगाव येथे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि जन आरोग्य योजना मोफत शिबिर

इगतपुरीनामा न्यूज, दि. 21

भाजपाचे इगतपुरी तालुका संघटन सरचिटणीस भाऊसाहेब धोंगडे यांच्या जन्मदिना निमित्त इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री  जन आरोग्य योजना यांचे मोफत शिबिर संपन्न झाले. यावेळी जवळपास 100 नागरिकांना दोन्ही योजनांचा लाभ पूर्णपणे मोफत देण्यात आला. ग्रामस्थांना विमा व गोल्डन कार्ड मोफत वाटप करण्यात आले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. भाऊसाहेब  धोंगडे यांची गावा प्रति असलेली भावना निश्चितच  अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार ग्रामस्थांनी काढले. योजनेचा लाभ मिळाल्याने नागरिकानी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर, जिल्हा चिटणीस मयूर परदेशी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रवींद्र गव्हाणे, तालुका उपाध्यक्ष सागर नाठे, तानाजी कडू, प्रदीप दालभगत, चेतन जोशी, वैभव बऱ्हे, महेश सहाणे, तानाजी रुमणे, रोहन दगडे, जनार्दन शिंदे, ओमकार मांदळे आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने जन्मदिन सार्थकी लागावा म्हणून ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यापुढे तालुकाभरात अनेक लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन करणार अणि मोदींचे समृद्ध भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे मत भाऊसाहेब धोंगडे यांनी व्यक्त केले.