
इगतपुरीनामा न्यूज – गोंदे दुमाला येथील विद्यार्थ्यांनी हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या इंडियन ऑलिंपियाड नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत गोंदे दुमाला येथील विद्यार्थी वेदांत गणेश शेळके व अलोक मधुकर नाठे यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. इंडियन ऑलिंपियाड तर्फे अबॅकस मानसिक अंकगणितीय राष्ट्रीयस्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये १५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामधून आय जीनियस अबॅकस अकॅडमी इंडिया प्रा. लि. मधील कविता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांत शेळके व अलोक नाठे या विद्यार्थ्यांनी ५ मिनिटात १०० अंकगणित प्रश्न सोडवून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. आय जीनियसचे संचालक योगेश पवार, निता पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.