सह्याद्रीच्या रानवाटा ट्रेकर्स ग्रुपची रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यात उपस्थिती : मार्गदर्शक गणपत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

इगतपुरी तालुक्यातील सह्याद्रीच्या रानवाटा ट्रेकर्स ग्रुपने आतापर्यंत अनेक गड किल्ले सर केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे माहिती जमा करत महाराजांचा इतिहास समजून घेण्यासाठी सह्याद्रीच्या रान वाटा ट्रेकर्स ग्रुप नेहमी अग्रेसर असतो. ग्रुपचे मार्गदर्शक गणपत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवछत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यासाठी यावर्षीही कार्यकर्त्यांना घेऊन रायगडाचा इतिहास माहिती करण्यासाठी गोंदे दुमाला भागातून असंख्य शिवरायांच्या मावळ्यांनी यावर्षीही हजेरी लावली.

गोंदे दुमालाचे माजी सरपंच व सह्याद्रीच्या रानवाटा ट्रेकर्स ग्रुपचे मार्गदर्शक गणपत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील असंख्य गड-किल्ल्यांची सफारी सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती जमा करण्यासाठी गेल्या सहा वर्षापासून ग्रुप जात असतो. आत्तापर्यंत अनेक कठीण किल्ल्याची चढाई करून महाराजांबद्दल असलेले आदर आपल्या बरोबरच सह्याद्रीच्या कुशीत वर्षभर ऊन, वारा, पावसात दर शनिवारी रविवार असे दोन दोन दिवस आपल्या असलेल्या सर्व सवंगड्यांना घेऊन गड किल्यांची चढाई होते. आतापर्यंत अनेक किल्यांवर श्रमदान, साफ सफाई करण्याचे व जुने बारव स्वछ करण्याचे काम पुर्ण करून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्साहात रायगड किल्यावर  राज्याभिषेक सोहळ्यासाठी सह्याद्रीच्या रानवाटा ग्रुपने स्वयंसेवक म्हणून यावर्षीही उपस्थित राहत   राज्याभिषेक सोहळा अनुभला.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!