इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
आनंदवल्ली नाशिकच्या मनपा शाळेतील शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी विद्यार्थ्यांसाठी “अधिकारी आपल्या भेटीला” हा ऑनलाईन संवाद साधणारा उपक्रम सुरू केलेला आहे. कोविडमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग व्हावा, मिळणाऱ्या दर्जेदार ऑनलाईन शिक्षणाचा भविष्यासाठी सदुपयोग व्हावा. यासाठी ह्या उपक्रमाची संकल्पना साकारली आहे. आतापर्यंत अनेक यशस्वी अधिकाऱ्यांनी ह्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे.
त्यानुसार नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाईन संवादात एसइआरटी पुणे येथील उपसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. तब्बल दीड तास सुरू असलेल्या संवादात डॉ. आवटे यांनी विद्यार्थ्यांना अधिकारी नक्की बना. पण एक आदर्श माणूस बनायला विसरू नका असा संदेश दिला. आजच्या शर्यतीच्या काळात आपल्या लोकांसह मित्रमैत्रिणींना बरोबर घेऊनच पुढे वाटचाल करा असे मार्गदर्शन सविस्तर मार्गदर्शन केले. पुढील शिक्षणासाठी कधीही माझी मदत लागली तर मला फोन नक्की करा असेही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले.
चिमुकल्या विद्यार्थ्यांना एवढे मोठे मार्गदर्शन मिळवून देणाऱ्या “अधिकारी आपल्या भेटीला” उपक्रमाची संकल्पना साकारणाऱ्या शिक्षिका कुंदा बच्छाव यांचे डॉ. कमलादेवी आवटे यांनी कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून हे विद्यार्थी भविष्यात मोठे अधिकारी नक्की बनतील असा आशावाद व्यक्त केला. नाशिक मनपाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर, डाएट नाशिकचे योगेश सोनवणे, उर्मिला उशीर, प्रल्हाद हंकारे आदींसह जिल्ह्यातील शिक्षक विद्यार्थी ऑनलाईन कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कैलास ठाकरे, सहशिक्षिका वैशाली भामरे, पुनम भामरे, नलिनी अहिरे यांचे सहकार्य लाभले.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group
3 Comments