गोंदे जवळ मोटारसायकलींच्या अपघातात २ जण जखमी : तहसीलदार कासुळे, गोरख बोडके यांच्या सतर्कतेने अपघातग्रस्तांना मिळाली मदत

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतील थायसन कृप कंपनीजवळ आज सकाळी १० वाजता २ मोटारसायकलींचा अपघात झाला. यामध्ये २ जण जखमी झाले आहेत. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके हे ह्या परिसरातुन जात असल्याने त्यांनी सतर्कतेने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना माहिती दिली. त्यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल केले. तहसीलदार परमेश्वर कासुळे, गोरख बोडके यांच्यासह नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेमुळे जखमी व्यक्तींना वैद्यकीय मदत वेळेत मिळाल्याने त्यांचा जीव बचावला. भास्कर सराई वय 45 रा. कुशेगाव, आनंद अमरसिंग वय 36 रा. राजस्थान अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!