रस्ते सुरक्षा कृती समितीच्या निवेदनाची महामार्ग विभागाकडून दखल : समिती सदस्यांसह अधिकाऱ्यांची अपघात थांबण्यासाठी पाहणी ; उपाययोजनेची कामे सुरू होणार

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई आग्रा महामार्गावरील विल्होळी ते इगतपुरी दरम्यान अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करावी या मागणीचे निवेदन रस्ते सुरक्षा कृती समितीचे  मुख्य निमंत्रक भाई संदीप पागेरे, अध्यक्ष डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे कार्यकारी अध्यक्ष सिमा दिवटे यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी कृती समितीच्या सदस्यांसमवेत घोटी टोल ते गोंदे दुमाला फाटा या दरम्यान पाहणी करण्यात आली. त्यानुसार महामार्गा वर प्रत्येक फाट्यावर तात्पुरती उपाययोजना म्हणून वाहनांची गती कमी करण्यासाठी आधुनिक प्रकारचे गतिरोधक व वेग नियंत्रण फलक लावण्यात येणार आहे.

महामार्ग प्रशासनाकडून अपघातग्रस्तांसाठी एक राखीव रुग्णवाहिका द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर्व पुलांची पाहणीही करण्यात आली असुन पावसाळ्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना आठवडाभरात पुर्ण होईल असा शब्द महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिला. २ जुनपासुन गोंदे दुमाला फाट्यापासून काम सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वीचे आंदोलन तूर्तास मागे घेतले असेल तरी विहित वेळेत काम केले नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीचे मुख्य निमंत्रक भाई संदीप पागेरे यांनी यावेळी दिला. यापुढे महामार्गासह तालुक्यांतील विविध रस्त्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या कामांवर रस्ता सुरक्षा कृती समितीचा तिसरा डोळा असणार आहे. नागरिकांनी त्यांच्या भागातील रस्त्यांवर वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीने काही अभाव आढळल्यास कृती समितीकडे तक्रार करावी असे आवाहन यावेळी समितीने केले. याप्रसंगी रस्ते सुरक्षा कृती समितीचे मुख्य निमंत्रक भाई संदीप पागेरे, अध्यक्ष डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे, कार्यकारी अध्यक्षा सिमा दिवटे, गोकुळ धोंगडे, आत्माराम मते, संजय कश्यप, ऋषिकेश मुधळे, अजय कश्यप,  संतोष आहेर आदी सदस्य उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!