क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीनिमित्त तैलचित्रांचे मंत्रालयात उद्या अनावरण

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मंत्रालय मुख्य इमारत प्रवेश दालनात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचा अनावरण कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उद्या सोमवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ सकाळी ९. ३० वाजता होईल.

LIVE पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://www.facebook.com/ChhaganCBhujbal/

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!