मोटारसायकल घसरल्याने झालेल्या अपघातात वाडीवऱ्हे येथील युवक गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

मुंबई आग्रा महामार्गावर लिअर कंपनीजवळच्या महाले पेट्रोल पंप परिसरात मोटारसायकल घसरल्याने सव्वा आठच्या दरम्यान अपघात झाला. ह्या अपघातात वाडीवऱ्हे येथील युवक गंभीर जखमी झाला आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन गंभीर जखमी युवकाला नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. वाडीवऱ्हेकडून मुंबईच्या दिशेने जाणारी मोटारसायकल क्रमांक MH 15 HD 7156 लिअर कंपनीसमोर आज सव्वाआठच्या दरम्यान अचानक घसरल्याने हा अपघात झाला. ह्या अपघातात शेखर संतोष घोलप वय 25 रा. वाडीवऱ्हे हा युवक गंभीर जखमी झाला. नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेच्या तत्पर सेवेमुळे त्याला जीवदान मिळाले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!