लिअर कंपनीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलवरील २ जण गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २

नासिककडून मुंबईच्या दिशेने कडे जात असताना लिअर कंपनीजवळ एका अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने अपघात झाला. आज पहाटे सव्वासहा वाजता हा अपघात करुन अज्ञात वाहन पसार झाले. अपघातात मोटरसायकल वरील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. राजाराम रामकृष्ण तिदमे वय 45 रा. गंगापूर, नाशिक, दत्तू पंडित पिंगळे वत 55 रा. मातोरी, नाशिक हे दोघे गंभीर जखमी झालेले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!