
इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
मुंबई नाशिक महामार्गावर पाडळी देशमुख जवळील हॉटेल महाराष्ट्र माझा समोर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना उभा असलेला कंटेनर क्रमांक GJ 12 BV4906 ह्याला मागून येणाऱ्या गॅसने भरलेला गॅस टँकर क्रमांक MH 04 JK 4166 ने जोरदार धडक दिली. यात गॅस टँकरचा दर्शनी भाग पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला. या अपघातात टँकरचालक शिवकुमार सनमुगम वय ३७ रा. तामिळनाडू हा अडकुन जखमी झाला. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी अपघातस्थळी दाखल होऊन जखमीला घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत टँकर चालकाला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढले. अपघातग्रस्त गॅस टँकर बाजूला काढण्याचे काम सुरू असून एकेरी वाहतूक संथगतीने सुरू आहे